Pune Ganesh Mandap: पुण्याच्या पेठांमध्ये गणेश मंडपांमुळे वाहतुकीचा बोजवारा!

रस्त्यांचा मोठा भाग मंडपांनी व्यापला; पीक अवर्समध्ये रुग्णवाहिका, पीएमपीएमएल बसही कोंडीत
Pune Ganesh Mandap
Pune Ganesh MandapPudhari
Published on
Updated on

पुणे: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मध्यवर्ती पेठ भागात गणेश मंडळांकडून देखावे आणि मंडप उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, काही लहान-मोठ्या मंडळांनी नियमांना धाब्यावर बसवून, थेट निम्म्यापेक्षा अधिक रस्त्यांवरच अवाढव्य मंडप उभारल्याने पेठ भागात पीक अवरला वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडत आहे.

Pune Ganesh Mandap
Jaggery Sale Case: गूळ विक्रीप्रकरणी तरुणाला अटक; जामीन मिळाल्यानंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

त्यामुळे महापालिका प्रशासनाने मंडळाच्या देखावे मंडपांचे नियोजन शिस्तबध्द स्वरूपात करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्त्याला जोडणाऱ्या अरुंद गल्लीबोळांत मंडपांचे खांब आणि कामाच्या साहित्यामुळे रस्त्यांची रुंदी सध्या कमालीची घटली आहे.

Pune Ganesh Mandap
Wada Gram Panchayat No Confidence Motion: वाडा ग्रामपंचायतीत राजकीय भूकंप; उपसरपंच रोहिदास शेटेंविरोधात बहुसंख्य सदस्यांचा अविश्वास ठराव

यामुळे सकाळच्या आणि सायंकाळच्या पीक अवर्समध्ये रुग्णवाहिका, पीएमपीएमएल बस आणि नोकरदारांची वाहने तासन्‌‍‍ तास कोंडीत अडकून पडत आहेत. उत्सवाचा आनंद नक्कीच आहे; पण रस्त्यांवरून चालणेही अशक्य व्हावे इतकी बेफिकिरी योग्य नाही, असा संताप पुणेकर नागरिक आणि वाहनचालक व्यक्त करीत आहेत.

Pune Ganesh Mandap
Non Teaching Staff Recruitment: शिक्षकेतर भरतीला वेग; वैयक्तिक मान्यतेसाठी ‘नॉन-टीचिंग पोर्टल’

पुणेकरांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, पोलिसांनी व महापालिकेने दिलेल्या नियमावलीनुसारच मंडप उभारले जातील, याची काटेकोर पाहणी करावी. तसेच, वाहतुकीला अडथळा न ठरता देखावे आणि मंडप कसे उभारता येतील, यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत.

Pune Ganesh Mandap
Overseas Education Scholarship: परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी ६८ विद्यार्थ्यांची निवड; ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिकेत उच्च शिक्षणाची संधी

पेठ भागात रोज गाडी चालवणे म्हणजे मोठी कसरत झाली आहे. सणाचा उत्साह नक्कीच असावा; पण रस्त्याचा तीनचतुर्थांश भाग काही मंडळांच्या मंडपांनीच व्यापल्यामुळे 15 मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास लागतोय. मंडळांनी सामाजिक भान ठेवून थोडी जागा वाहतुकीसाठी मोकळी सोडायला हवी. प्रशासनानेही फक्त कागदावर नियम न ठेवता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाई करावी.

सिध्देश वाघ, वाहनचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news