Non Teaching Staff Recruitment: शिक्षकेतर भरतीला वेग; वैयक्तिक मान्यतेसाठी ‘नॉन-टीचिंग पोर्टल’

कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यकांच्या नियुक्त्यांची ऑनलाइन प्रक्रिया; शालार्थ कार्यवाहीही पोर्टलवरून
Recruitment
RecruitmentPudhari
Published on
Updated on

पुणे: कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देण्यासाठी स्वतंत्र 'नॉन-टीचिंग वैयक्तिक मान्यता पोर्टल' तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवरूनच नियुक्त्यांना वैयक्तिक मान्यता आणि शालार्थसंबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी भरतीला आता खऱ्या अर्थाने वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Recruitment
Overseas Education Scholarship: परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी ६८ विद्यार्थ्यांची निवड; ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिकेत उच्च शिक्षणाची संधी

राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः आणि पूर्णतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर पदांच्या भरती प्रक्रियेला आता ऑनलाइन स्वरूप देण्यात आले आहे. शासनाच्या ११ ऑगस्ट २०२६च्या निर्णयानुसार रिक्त शिक्षकेतर पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु त्यापूर्वी पदोन्नती आणि अनुकंपा नियुक्तीचा मार्ग अवलंबणे बंधनकारक आहे. या दोन्ही प्रक्रियेनंतरही पदे रिक्त राहिल्यास संचमान्यतेनुसार निश्चित रिक्त पदांच्या ८० टक्के पदे सरळसेवेने भरता येणार आहेत.

Recruitment
Samagra Progress Report: ‘समग्र प्रगतिपुस्तिका’ची राज्यस्तरावर झाडाझडती; अधिकाऱ्यांना १५ शाळांची तपासणी बंधनकारक

सरळसेवा भरतीसाठी संस्थांनी अद्ययावत बिंदुनामावली तपासून घेणे, जाहिरातीचे प्रारूप तयार करून संबंधित शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. जाहिरात स्थानिक व राज्यस्तरीय वृत्तपत्रांसह संस्थेच्या संकेतस्थळावर आणि शाळेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी लागणार आहे. अर्ज, छाननी, मुलाखत आणि अंतिम निवडीसाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Recruitment
Pune Loudspeaker Controversy: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ परवानगीवरून वाद; पोलिसांच्या निर्णयावर पुणेकर मंचाचा आक्षेप

मुलाखतीचे इन-कॅमेरा चित्रीकरण

खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३८, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे राहणार आहे. नियुक्तीचा सुरुवातीचा तीन वर्षांचा कालावधी मानधनावर असेल. तसेच मुलाखतीचे इन-कॅमेरा चित्रीकरण करून त्याची नोंद संस्थेला जतन करावी लागणार आहे.

Recruitment
Pune Adulterated Paneer: पुण्यात भेसळयुक्त पनीर-खव्यावर एफडीएचा छापा; ४ ट्रक माल जप्त

पोर्टलचे संकेतस्थळ लवकरच

दि. २८ मे २०२५पूर्वी झालेल्या नियुक्त्यांची वैयक्तिक मान्यता व शालार्थसंबंधी कार्यवाही देखील याच पोर्टलवरून करावी लागणार आहे. पोर्टलचे संकेतस्थळ लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून, संबंधित शाळांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती त्यावर सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news