पुणे: कोळवाडी येथे वायर तुटल्याने क्रेन विहिरीत कोसळून एक ठार

पुणे: कोळवाडी येथे वायर तुटल्याने क्रेन विहिरीत कोसळून एक ठार

नसरापूर: पुढारी वृत्तसेवा:  जलजीवन योजनेतील विहिरीचे काम सुरू असताना वायर रोप तुटून क्रेन विहिरीत पडली. या दुर्घटनेत एक कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून विहिरीत अडकलेल्या सर्व कामगारांना सुरक्षित करण्यात यश आले आहे. सर्व कामगार गडचिरोली जिल्ह्यातील तसेच काही परप्रांतीय असून घटनेमध्ये दोन महिला, आठ पुरुषांचा समावेश आहे.

कोळवडी (ता. भोर) येथील नसरापूर – वेल्हा रोडलगत असणाऱ्या ओढ्यात विहिरीचे खोदकाम सुरू असून ही सोमवार (दि. २९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अंकुश प्रभाकर गेडाम वय २३ ( रा. गडचिरोली ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून विजेंद्र रामानंद भारद्वाज वय ४९ ( रा. उत्तरप्रदेश ) असे चिंताजनक असलेल्या गंभीर जखमीचे नाव आहे. मात्र इतर सुरक्षित वाचवलेल्या कामगारांची नावे समजू शकले नाही. घटना घडल्यानंतर दुसरी क्रेनच्या साह्याने विहिरीत अडकलेल्या इतर कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

विहिरीचे खोदकाम करताना दुपारची जेवणाची सुट्टीनंतर क्रेनच्या बकेटमध्ये बसवून कामगारांना खाली सोडत असताना अचानक क्रेनची वायर रोप तुटून जवळपास ५० फूट खाली बकेट पडला. वायर रोपचा लोखंडी हुक डोक्यात पडल्याने बकेट मधील अंकुश हे जागीच ठार झाले. घटना घडल्यानंतर घटनास्थळी गावचे पोलीस पाटील अजित शिंदे, प्रमोद शिंदे व इतर कामगारांनी रुग्णवाहिका बोलून जखमींना सिद्धिविनायक रुग्णालयात पोहोचवण्यात आले. तसेच विहिरीत इतर काम करत असलेले कामगारांना दुसऱ्या क्रेनच्या साह्याने खाटेवर बसवून बाहेर काढण्यात आले.

सुदैवाने इतर बचावले

क्रेनच्या साह्याने बकेट मधून कामगारांना खाली सोडण्यात येत होते. यावेळी विहिरीत अगोदरच कामगार एका कडेला सावलीला उभे होते. तर बकेट दुसरा कडेला पडल्याने सुदैवाने कामगारांच्या अंगावर बकेट पडली नाही. यामुळे इतरांचे प्राण वाचले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news