NRI Divorce India: परदेशातील जोडप्याचा घटस्फोट ‘मखत्यारपत्रा’द्वारे पूर्ण; सासूंनी पार पाडली प्रक्रिया

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयीन मंजुरी; सहा महिन्यांचा कालावधी वगळला
Divorce
DivorcePudhari
Published on
Updated on

पुणे: परदेशात वास्तव्यास असलेल्या पती-पत्नीच्या घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया दोघांच्याही सासूंनी पॉवर ऑफ ॲटर्नी‌’ अर्थात मुखत्यारपत्राच्या आधारे पार पाडल्याची घटना कौटुंबिक न्यायालयात घडली. न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पती-पत्नीशी संवाद साधून त्यांचा निर्णय ऐच्छिक असल्याची खातरजमा केली अन्‌‍ सहा महिन्यांचा फेरविचार कालावधी रद्द करून दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे ज्या सासूंनी लग्न जुळविण्यासाठी पुढाकार घेतला त्यांनाच घटस्फोटाचाही कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागली.

Divorce
Pune Accident: पुण्यात धक्कादायक घटना; झोपलेल्या मुलीवरून कार गेली, दुर्दैवी मृत्यू

अनुराग आणि कोमलिका (दोघांची नावे बदलली आहेत) दोघे परदेशात आयटी कंपनीत उच्चपदावर नोकरी करतात. 28 जून 2023 मध्ये पुण्यातील कोरेगाव पार्कातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा विवाह झाला. विचारांमधील तफावत आणि टोकाच्या मतभेदांमुळे विवाहानंतर अवघ्या वर्षभरात मतभेद टोकाला गेले. सुमारे अकरा महिने एकत्र राहिल्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

Divorce
Pune Crime: पुण्यात सराफ तरुणाची आत्महत्या; प्रेमप्रकरणातून फसवणुकीचा आरोप

अपत्य नसल्याने दोघांनी विभक्त राहण्याच्या निर्णयावर कायदेशीर मोहोर उमटविण्याचे ठरविले. त्यासाठी परस्पर संमतीने घटस्फोटाचा अर्ज पुणे न्यायालयात दाखल केला. दोघेही परदेशात वास्तव्यास असल्याने त्यांना प्रत्येक तारखेला भारतात येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या आयांना मुखत्यारपत्र देऊन घटस्फोटाच्या कायदेशीर प्रक्रियेचे अधिकार दिले.

Divorce
Pune Storm Water Drainage Problem: पुण्यात पावसाळी निचऱ्याची गंभीर समस्या; फक्त 16% स्टॉर्म वॉटर लाइन

घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान पती-पत्नी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर झाले. त्यांनी स्वेच्छेने व परस्पर संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेत असल्याचे न्यायालयात सांगितले. समुपदेशकाच्या अहवालातही हे जोडपे पुन्हा एकत्र नांदण्याची शक्यता नसल्याचे नमूद होते. पती-पत्नीमध्ये पैशांसह कोणतेही वाद नव्हते.

Divorce
Drainage Department Investigation: पुणे ड्रेनेज खर्चावर चौकशीची मागणी; 3000 कोटींचा हिशोब संशयाच्या भोवऱ्यात

पती-पत्नी दोन वर्षे विभक्त राहात असल्याने हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13-बी अंतर्गत फेरविचारासाठी दिला जाणारा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाने शिथिल केला आणि केवळ दोन महिन्यांत घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. पत्नीच्या वतीने ॲड. रोहित एरंडे, तर पतीतर्फे ॲड. अभिदीप खळदकर यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news