Pune Crime: पुण्यात सराफ तरुणाची आत्महत्या; प्रेमप्रकरणातून फसवणुकीचा आरोप

फुरसुंगीत धक्कादायक घटना; लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप, तरुणीवर गुन्हा
Assault On Men
Assault On MenPudhari
Published on
Updated on

पुणे: प्रेमाच्या जाळ्यात खेचल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीने फसवणूक केल्याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने, एका सराफ व्यावसायिक तरुणाने दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने तब्बल बारा पानांची सुसाईड नोट लिहिली असून, त्यामध्ये आत्महत्या करण्याचे कारण सांगितले आहे. ही धक्कादायक घटना 6 मार्च रोजी फुरसुंगीत घडली.

Assault On Men
Pune Storm Water Drainage Problem: पुण्यात पावसाळी निचऱ्याची गंभीर समस्या; फक्त 16% स्टॉर्म वॉटर लाइन

प्रतीक राजेंद्र मेमाणे (वय 29, रा. फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे, तर याप्रकरणी प्रतीक याचे वडील राजेंद्र मेमाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्रेया दादासोा खोपडे-देशमुख (शिक्केकरी) (रा. आंबेड, भोर) हिच्या विरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2025 पासून 6 मार्च 2026 दरम्यान घडला आहे.

Assault On Men
Drainage Department Investigation: पुणे ड्रेनेज खर्चावर चौकशीची मागणी; 3000 कोटींचा हिशोब संशयाच्या भोवऱ्यात

प्रतीक यांचे फुरसुंगी येथे ‌’शर्वरी ज्वेलर्स‌’ नावाने सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. त्याची श्रेया सोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. श्रेयाने प्रतीकला लग्नाचे आमिष दाखविले. प्रतीकने तिला 50 हजार रुपयांची सोन्याची अंगठी, ड्रेस आदी वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या. तिने कॅन्सर झाल्याचे खोटे सांगितले होते. तरीही प्रतीक तिच्याशी लग्न करण्यास तयार झाला होता.

Assault On Men
Vegetable Price Drop: अवकाळी पावसाचा फटका; फळभाज्यांचे दर घसरले

मात्र, श्रेया काही ना काही कारण काढून त्याची भेट टाळत होती. प्रतीकला हा मानसिक धक्का सहन न झाल्याने त्याने दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात केले आहे. दरम्यान, प्रतीकने आत्महत्या करण्यापूर्वी तब्बल सोळा पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. त्यामध्ये आपण का आत्महत्या करतोय हे सांगितले आहे. सुरुवातीला याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी केली होती. त्यानंतर आता श्रेया हिच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Assault On Men
Pune Rain Alert: पुण्यात अतिवृष्टीचा अचूक अंदाज; खासगी कंपनीकडून तत्काळ माहिती

नाहीतर माझा आत्मा त्यांना सोडणार नाही

प्रतीकने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून तरुणीवर गंभीर आरोप केले आहेत. तिने फसवणूक केल्यानंतर लग्नाची भीती वाटू लागली आहे. लग्न करण्याची इच्छा संपली आहे. आई-वडिलांसाठी जगायचे ठरवले होते, पण मनातून ही गोष्ट जात नाही. यातून बाहेर पडता येत नाही. मला ती आवडली होती; मात्र तिने धोका दिला आहे. आई, वडील, ताई मला माफ करा. तिला फाशी द्या, अशी माझी इच्छा आहे; नाही तर माझा आत्मा तिला सोडणार नाही, असे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news