Pune Storm Water Drainage Problem: पुण्यात पावसाळी निचऱ्याची गंभीर समस्या; फक्त 16% स्टॉर्म वॉटर लाइन

जुन्या शहरात अपुरी यंत्रणा, नव्या भागांत सुविधा नाहीत; पावसाळ्यापूर्वी उपाययोजनांची गरज
Drainage Problem
Drainage ProblemPudhari
Published on
Updated on

पुणे: महानगरपालिका हद्दीत पावसाळी पाण्याच्या निचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील पावसाळी लाइनचे (स्टॉर्म वॉटर ड्रेनेज) जाळे अत्यंत अपुरे असल्याचे समोर आले आहे. विशेषतः जुन्या शहर भागात या लाइनचे प्रमाण केवळ 16 टक्के असल्यामुळे पावसाचे पाणी योग्यप्रकारे वाहून जाण्यात अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टीच्या काळात ही समस्या अधिक तीव स्वरूप धारण करीत असल्याचे चित्र आहे.

Drainage Problem
Drainage Department Investigation: पुणे ड्रेनेज खर्चावर चौकशीची मागणी; 3000 कोटींचा हिशोब संशयाच्या भोवऱ्यात

गेल्या काही वर्षांत शहरात 32 गावांचा समावेश झाल्याने शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, नव्याने समाविष्ट भागांमध्ये मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. रस्त्यांचे जाळेच अपुरे असताना पावसाळी लाइनची व्यवस्था अनेक ठिकाणी अस्तित्वातच नाही. त्यामुळे पावसाळ्यात या भागांमध्ये परिस्थिती अधिकच बिकट होते.

Drainage Problem
Vegetable Price Drop: अवकाळी पावसाचा फटका; फळभाज्यांचे दर घसरले

जुन्या शहर भागातही पावसाळी लाइनचे जाळे सर्वत्र पोहचलेले नाही. मुख्यतः 24 मीटर रुंदीच्या रस्त्यांवरच या लाइन टाकण्यात आल्या असून, अरुंद रस्ते आणि वस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. काही भागांत रस्त्यांना उतार असल्याने पाणी नैसर्गिकरीत्या वाहून जाते. मात्र, समपातळीवरील किंवा खोलगट भागांमध्ये योग्य निचरा यंत्रणा नसल्याने पाणी साचून राहते. दरम्यान, पावसाळा जवळ येत असताना या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Drainage Problem
Pune Rain Alert: पुण्यात अतिवृष्टीचा अचूक अंदाज; खासगी कंपनीकडून तत्काळ माहिती

अपुरे नियोजन, कमी रस्ते आणि अपूर्ण पावसाळी लाइन, यामुळे शहरातील जलनिस्सारण व्यवस्थेवर ताण वाढला आहे. याबाबत महापौर नागपुरे यांनी सांगितले की, अल्प कालावधीत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पाणी साचून गंभीर परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर स्टॉर्म वॉटर ड्रेनेजलाइनच्या सफाईची कामे सुरू करण्यात आली आहेत. पावसाचे पाणी जलद गतीने वाहून जावे, यासाठी पाइपलाइनची क्षमता वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

Drainage Problem
BATU University Affiliation: बाटू विद्यापीठाच्या संलग्नीकरणात मोठा बदल; महाविद्यालयांना मुभा

सर्वंकष डीपीआरचा अभाव

जुन्या शहर हद्दीतील पावसाळी लाइनसाठी अद्याप सर्वंकष सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आलेला नाही. मात्र, नव्याने समाविष्ट झालेल्या 11 आणि 23 गावांसाठी डीपीआर तयार करण्यात आल्याची माहिती आहे. शहरातील रस्त्यांचे प्रमाणही अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत रस्त्यांचे प्रमाण केवळ 9 ते 10 टक्के असून, नियमानुसार ते किमान 15 टक्के असणे अपेक्षित आहे. विशेषतः समाविष्ट गावांमध्ये रस्त्यांचे जाळे विकसित न झाल्याने विकासकामांवरही परिणाम होत आहे.

पुणे शहरातील जुन्या स्टॉर्म वॉटर पाइपलाइनचे प्रमाण केवळ 16 टक्के आहे. ते गरजेच्या तुलनेत अपुरे असल्याने नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेतले आहे.

नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news