Pune Accident: पुण्यात धक्कादायक घटना; झोपलेल्या मुलीवरून कार गेली, दुर्दैवी मृत्यू

वढू खुर्द येथे अपघात; लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
  Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

पुणे: शेडमध्ये झोपलेल्या आठ वर्षीय मुलीच्या अंगावरून मोटार गेल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.03) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मौजे वढु खुर्द, रामनगर, लेन क्रमांक चार येथील परिसरात घडली आहे. मोटार शेडमध्ये लावत असताना हा अपघात झाला आहे. मैराबी रसुलसाब बळीगर (वय 9) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

  Accident
Pune Crime: पुण्यात सराफ तरुणाची आत्महत्या; प्रेमप्रकरणातून फसवणुकीचा आरोप

याप्रकरणी लालसाहेब महमंदसाब कालेगार (वय 39, रा. लोणीकंद, मूळ जुमलापूर, कर्नाटक) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोटारचालक भरत रमेश नेहेते (वय 46, रा. रामनगर, वढू खुर्द) याच्याविरुद्ध मुलीच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैराबी हिचे आई-वडील मजूर आहेत. वढू खुर्द येथील एका इमारतीचे बांधकाम सुरू असून तेथे ते बांधकाम मजूर म्हणून काम करत होते.

  Accident
Pune Storm Water Drainage Problem: पुण्यात पावसाळी निचऱ्याची गंभीर समस्या; फक्त 16% स्टॉर्म वॉटर लाइन

मैराबी ही बांधकामाजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपली होती. दरम्यान, नेहेते हे त्यांच्याकडील मोटार शेडमध्ये पार्क करत होते. त्या वेळी अंधार असल्याने शेडमध्ये मैराबी झोपली असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. तिच्या अंगावरून चारचाकी गेल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news