Pune Fish Chicken Rates: पुण्यात मांसाहाराला ब्रेक; चिकन-अंड्यांचे दर घसरले, मासळी मात्र तेजीत

आखाड्यातील शेवटच्या रविवारी एकादशीचा परिणाम; मासळीची आवक मर्यादित, आषाढ अमावस्येमुळे मंगळवार-बुधवारी मागणी वाढण्याची शक्यता
Fish
Fish Pudhari File Photo
Published on
Updated on

पुणे: आखाडातील शेवटच्या रविवारी एकादशी आल्याने घरगुती ग्राहकांनी मांसाहाराकडे पाठ फिरविल्याचे चित्र बाजारात दिसून आले. परिणामी, मासळी, मटण आणि चिकनची मागणी तुलनेने कमी राहिली. हॉटेल व्यावसायिकांकडून मात्र खरेदी सुरू होती. देशाच्या पूर्व किनारपट्टीवरून मोठ्या प्रमाणात, तर पश्चिम किनारपट्टीवरून तुरळक मासळी बाजारात दाखल होत आहे. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने मासळीचे तेजीतील दर टिकून असल्याचे सांगण्यात आले.

Fish
Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन; शेतकऱ्यांना संमतिपत्रासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत

बाजारात होत असलेल्या मागणीपेक्षा पक्ष्यांचा पुरवठा मुबलक असल्याने चिकनच्या भावात किलोमागे दहा रुपये, तर इंग्लिश अंडीच्या भावात शेकड्यामागे वीस रुपयांनी घट झाली आहे. मागणी आणि पुरवठ्यात समतोल असल्याने मटण आणि गावरान अंड्यांचे भाव स्थिर आहेत. येत्या बुधवारी आषाढ अमावस्या असल्याने मंगळवार आणि बुधवारी मासळी, मटण आणि चिकनला मोठी मागणी राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. ९) खोल समुद्रातील मासळी १० ते १२ टन, खाडीच्या मासळीची सुमारे २०० ते ३०० किलो आणि नदीच्या मासळीची ४०० ते ५०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १५ ते २० टन इतकी आवक झाली.

Fish
Tukaram Mundhe FDA Action: मद्यापासून शीतपेयांपर्यंत भेसळीवर FDAची नजर; ‘तडजोड खपवून घेणार नाही’: तुकाराम मुंढे

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : २०००-२२००, मोठे : १८००-१९००, मध्यम : १४००-१६००, लहान : १२००-१४००, भिला : ९००-१०००, हलवा : १०००-११००, सुरमई १२००-१४००, रावस : १०००-१२००, घोळ : १०००-१२००, करली : ४००-५००, पाला : १०००-१२००, वाम : पिवळी ११००-१३००, काळी : ४००-५००, ओले बोंबील : ४००-५५०.

Fish
Pune Courier Boy Jewellery Theft: कुरिअर बॉयनेच ९० लाखांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले; पुण्यात खळबळ

कोळंबी : लहान : ३२०-३६०, मध्यम : ३६०-४८०, मोठी : ५५०-७५०, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ९००-१०००, लॉबस्टर : १९००-२२००, मोरी : ४००-५५०, मांदेली : २५०-३००, राणीमासा : ३००-४००, खेकडे : ३००-४००, चिंबोर्‍या : ६००-७००. खाडीची मासळी - सौंदाळे : ३५०-४००, खापी : ३५०-४००, तांबोशी : ६००-७००, पालू : ३००-३५०, लेपा : ४००-४५०, बांगडा : ३२०-४००, शेवटे : २५०-३००, बेळुंजी : १५०-२००, तिसर्‍या : २५०-३००, तारली : ३००-३५०.

Fish
Tribal Students Foreign Education Scholarship: परदेशातील उच्च शिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; ४० विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

नदीतील मासळी : रहू : १५०-२००, कतला : १६०-२००, मरळ : ३००-४००, शिवडा : २५०, खवली : २००-२५०, आम्ळी : १२०-१६०, खेकडे : २५०-४००, चिलापी : ६०-१६०, वाम : ४००-५००. मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २३०, लेगपीस २९०, जिवंत कोंबडी १८०, बोनलेस ३४०. अंडी : गावरान (शेकडा) ११५० डझन १५६, प्रतिनग १३. इंग्लिश (शेकडा) ५८०, डझन ८४, प्रतिनग ७.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news