Pune Courier Boy Jewellery Theft: कुरिअर बॉयनेच ९० लाखांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले; पुण्यात खळबळ

मुंबईला दागिने पोहोचवण्याऐवजी वाकडच्या पुलाखाली उतरून पसार; पुण्यात सराईत वाहनचोराकडून सहा दुचाकी जप्त, गांजा विक्री टोळीवर मोक्का
Courier Boy Jewellery Theft
Courier Boy Jewellery TheftPudhari
Published on
Updated on

पुणे: ग्राहकांचे ९० लाख ३३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने मुंबईला पोहोचवण्यासाठी घेऊन निघालेल्या कुरिअर बॉयनेच दागिने लंपास करून पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. जितेंद्र ऋषिकेश सिंह यांनी याबाबत खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल सत्यपाल चौहान (वय २०, रा. उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Courier Boy Jewellery Theft
Tribal Students Foreign Education Scholarship: परदेशातील उच्च शिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; ४० विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

पोलिसांच्या माहितीनुसार, सिंह यांची घोरपडे पेठेतील राष्ट्रभूषण चौकात एसजीएलजेपी लॉजिस्टिक प्रा. लिमिटेड नावाची कुरिअर कंपनी आहे. ग्राहकांचे पैसे, सोने-चांदीचे दागिने कुरिअरद्वारे पोहोचवण्याचे काम कंपनीकडून केले जाते. पुण्यासह सहा शहरांमध्ये कंपनीचे कामकाज आहे. चौहान हा कंपनीच्या मुंबई कार्यालयात कार्यरत होता. ५ ऑगस्ट रोजी विविध ग्राहकांचे ९० लाख ३३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने मुंबईला पोहोचवण्यासाठी चौहानकडे देण्यात आले होते.

Courier Boy Jewellery Theft
Hourly Basis Professors Approval: तासिका प्राध्यापकांच्या मान्यतेत दिरंगाई केल्यास कारवाई; प्राचार्यांचे वेतन रोखणार

मात्र, मुंबई कार्यालयात दागिने जमा न करता तो पसार झाला. याप्रकरणी खडक पोलिस अधिक तपास करत आहेत. फिर्यादी हे अनेक वर्षांपासून ग्राहकांचे सोने-चांदी कुरिअरद्वारे पोहोचविण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांची बस वाहकांशी ओळख आहे. चौहान मुंबई कार्यालयात पोहोचला नसल्याचे समजल्यानंतर फिर्यादींनी बस वाहकाशी संपर्क साधला. त्यावेळी चौहान मुंबईला न जाता वाकड येथील पुलाखाली उतरल्याचे वाहकाने सांगितले.

Courier Boy Jewellery Theft
Pune Nashik Railway Protest: पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी चक्काजाम! चाकणमध्ये आंदोलक-पोलिसांमध्ये जोरदार झटापट; नारायणगावात सर्वपक्षीय रास्ता रोको

सराईत चोरट्याकडून सहा दुचाकी जप्त

विश्रांतवाडी पोलिसांनी एका सराईत वाहन चोरट्याकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या. या दुचाकींची एकूण किंमत ४ लाख ८० हजार रुपये आहे. ओमकार रामभवन यादव (वय २०, रा. शांतीनगर, येरवडा) असे त्याचे नाव आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील पोलिस अंमलदार वामन सावंत आणि संजय बादरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ओमकार यादवला ताब्यात घेण्यात आले. त्याने विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. ही कारवाई सपोनि सुनील उगले, अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे यांच्या पथकाने केली.

Courier Boy Jewellery Theft
Pune Urban Challenge Fund: पुण्याला केंद्राचा मोठा दिलासा! पाणीपुरवठा अन् पूरनियंत्रणासाठी १,२९० कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर मोक्का

गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर कोंढवा पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. यास्मीन करीम शेख (वय ४५), आमीर समीर शेख (१९), शमा उर्फ जोहराबी मुस्ताक शेख (रा. सर्व कोंढवा) व इतर दोन वाँटेड आरोपी अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत. या आरोपींवर स्वारगेट व कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही त्यांनी त्यांचे गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवले आहे. त्यामुळे कोंढवा पोलिसांनी आरोपींविरुद्ध एनडीपीएसच्या गुन्ह्यात वरिष्ठ कार्यालयास मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, प्रशांत मंडले, संतोष चौधरी, उपनिरीक्षक सागर पवार, रवींद्र गावडेंनी कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news