Smita Jadhav: डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांना पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचा पाठिंबा...!

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचा पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवाराला पाठिंबा; वृत्तपत्र विक्रेता महामंडळासाठी पुढाकार घेण्याची जाधव यांची ग्वाही
Pune Graduate Constituency Smita Jadhav Newspaper Vendors Association Support
Pune Graduate Constituency Smita Jadhav Newspaper Vendors Association SupportPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: गेल्या २५ वर्षांपासून 'पुढारी'च्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचे बाळकडू मला मिळाले असून, वृत्तपत्र विक्रेता संघाचा हा बहुमूल्य पाठिंबा माझ्या विजयाचा मार्ग अधिक सुकर करेल, असे प्रतिपादन (भारतीय जनता पार्टी - महायुती) पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांनी केले.

Pune Graduate Constituency Smita Jadhav Newspaper Vendors Association Support
Maharashtra Legislative Council Elections: विधानपरिषदेच्या पाचही जागा जिंकण्यासाठी महायुतीचे नियोजन; फडणवीसांचा विश्वास

अप्पा बळवंत चौकात ‘जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिन’ गुरुवारी (दि.15) उत्साहात साजरा करण्यात आला, याप्रसंगी त्या बोलत होत्या. या विशेष प्रसंगी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांना आगामी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आणि त्यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांच्या उपस्थितीत डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांच्या हस्ते हस्ते केक कापून 'जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिन' साजरा करण्यात आला.

Pune Graduate Constituency Smita Jadhav Newspaper Vendors Association Support
PSI Dowry Harassment Case: पीएसआय पतीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप; सर्व्हिस पिस्तूल दाखवून धमकावल्याची तक्रार

कार्यक्रमादरम्यान वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आगामी काळात डॉ. स्मिताताई जाधव यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही यावेळी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाकडून करण्यात आली. यावेळी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकुले, सचिव अरुण निवंगुणे, खजिनदार संदीप शिंदे यांच्यासह विश्वस्त पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune Graduate Constituency Smita Jadhav Newspaper Vendors Association Support
Pune University Protest Restrictions: पुणे विद्यापीठात सभा, मोर्चे आणि आंदोलनांवर निर्बंध; विद्यार्थी संघटनांचा तीव्र विरोध

शिक्षण क्षेत्रातील वारसा फायदेशीर ठरणार...

डॉ. स्मिताताई जाधव म्हणाल्या की, मी गेल्या २० वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. हा शैक्षणिक वारसा मला जनतेची सेवा करताना नक्कीच फायदेशीर ठरेल. पदवीधर आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तसेच, वृत्तपत्र विक्रेता महामंडळ निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच पुढाकार घेऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Pune Graduate Constituency Smita Jadhav Newspaper Vendors Association Support
Gen Z Reading Habits: रील्स, गेम्स अन् एआयच्या जमान्यातही जेन झींचे पुस्तकप्रेम कायम!

वृत्तपत्र विक्रेता महामंडळ निर्मितीसाठी पुढाकार घेणार....

जागतिक वृत्तपत्र दिनाच्या निमित्ताने बोलताना डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हिताला प्राधान्य दिले. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव करत, त्यांच्या भविष्यासाठी आणि कल्याणासाठी ‘वृत्तपत्र विक्रेता महामंडळ’ निर्माण करण्याबाबत आपण स्वतः विशेष पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.​गेली अनेक वर्षे ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता घरोघरी ज्ञान आणि बातम्या पोहोचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सर्व समस्या आगामी काळात प्राधान्याने सोडवल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

वाचकांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावे: विजय पारगे...

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे म्हणाले, दैनिक पुढारी आणि स्मिताताई या आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत. त्या पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत असून वृत्तपत्र विक्रेता संघाचा त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे. आम्ही आमच्या सर्व वृत्तपत्र विक्रेते आणि वाचक यांना आवर्जून आवाहन करतो की, त्यांनी महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news