Maharashtra Legislative Council Elections: विधानपरिषदेच्या पाचही जागा जिंकण्यासाठी महायुतीचे नियोजन; फडणवीसांचा विश्वास

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा आढावा; मतदार नोंदणी आणि मतदान वाढविण्यावर भर
Maharashtra Legislative Council Elections
Maharashtra Legislative Council ElectionsPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: कोणतीही निवडणूक असो, ती पूर्ण ताकदीने लढवावी लागते. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि कार्यकर्ते पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत सहभागी होऊन महायुतीच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान कसे होईल, यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे विधानपरिषदेच्या या पाचही जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Maharashtra Legislative Council Elections
PSI Dowry Harassment Case: पीएसआय पतीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप; सर्व्हिस पिस्तूल दाखवून धमकावल्याची तक्रार

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. १४) बावधन येथील एका हॉटेलमध्ये पुणे शहर, पुणे जिल्हा, नगरसेवक, पदाधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्यांची बैठक पुण्यात घेतली. तसेच, पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठकही त्यांनी घेतली. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

Maharashtra Legislative Council Elections
Pune University Protest Restrictions: पुणे विद्यापीठात सभा, मोर्चे आणि आंदोलनांवर निर्बंध; विद्यार्थी संघटनांचा तीव्र विरोध

फडणवीस म्हणाले की, पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्यासाठी भाजपसह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार आणि मंत्री एकजुटीने काम करतील. पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक तयारी चांगली असून निवडणुकीचे नियोजनही चोख आहे. पदवीधर मतदारसंघासाठी शरद लाड आणि भैया माने यांनी यापूर्वी चांगली तयारी केली होती. मात्र, पक्षाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी डॉ. स्मिता जाधव यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भैया माने, तर सांगलीसह अन्य जिल्ह्यांमध्ये शरद लाड यांनी निवडणुकीची जबाबदारी स्वीकारली आहे, ते चांगले काम करीत आहेत.

Maharashtra Legislative Council Elections
Gen Z Reading Habits: रील्स, गेम्स अन् एआयच्या जमान्यातही जेन झींचे पुस्तकप्रेम कायम!

नागपूर, पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघांत भाजपचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांना महायुतीतील सर्व घटकपक्षांचे कार्यकर्ते सहकार्य करतील. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचा, तर छत्रपती संभाजीनगर विभागात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप आणि महायुतीतील अन्य घटकपक्षांचे कार्यकर्ते संबंधित उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करतील. पुणे विभागातील दोन्ही जागांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार आणि मंत्री भाजपच्या उमेदवारांसाठी काम करतील. त्यामुळे राज्यातील पाचही जागांवर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असे फडणवीस म्हणाले.

Maharashtra Legislative Council Elections
Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यूचा उद्रेक; ६०० हून अधिक बांधकाम व्यावसायिक महापालिकेच्या रडारवर!

मतदार नोंदणी आणि मतदानावर भर

मतदार नोंदणीच्या आकडेवारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, अनेकदा विधानपरिषद निवडणुकीकडे कमी लक्ष दिले जाते; मात्र या निवडणुकीत अधिक मेहनत आणि नियोजन आवश्यक असते. त्यामुळे मतदार नोंदणी आणि मतदानावर भर देऊन प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले असून बैठकीत दिसलेली तयारी समाधानकारक असल्याचे फडणवीस म्हणाले. या संघटनात्मक तयारीच्या जोरावर पाचही जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news