Pune News : आत दाम्पत्याचे समुपदेशन; बाहेर विहिणींमध्ये हाणामारी

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वाद असलेल्या दाम्पत्याला समुपदेशनासाठी बोलावले होते. दोघांचे समुपदेशन करून उसवलेली नात्याची वीण पुन्हा जोडण्याचे काम समुपदेशक करीत होते. मात्र, तेवढ्यात दोघी विहिणी एकमेकींसोबत हाणामारी करीत भिडल्या. हे दृश्य पाहून सूनबाईंनी वादात उडी घेतली अन् नवर्‍याच्या आईला मारहाण केली. हा हायव्होल्टेज ड्रामा भरोसा सेल येथे सोमवारी घडला.
दरम्यान, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करीत वाद सोडवून त्यांची रवानगी बंडगार्डन पोलिस ठाण्यात केली.

त्याचे झाले असे की, 2020 दाम्पत्याचा विवाह झाला होता. त्यांच्यात कौटुंबिक कारणातून वाद होऊ लागले. दोघांनी पुणे पोलिसांच्या भरोसा सेलकडे अर्ज केला होता. दोघांचे समुपदेशन पोलिस करीत होते. सोमवारी त्यांना परत समुपदेशनासाठी बोलाविले होते. त्यांच्यासोबत दोघांच्या आईदेखील आल्या होत्या. समुपदेशनाच्या वेळी दोघी विहिणी भरोसाच्या आवारात बसल्या होत्या. बोलाबोलीतून त्यांच्यात वाद सुरू झाला. वाद काही वेळातच एवढा विकोपाला गेला, की दोघींनी एकमेकींचे केस पकडून मारहाण केली.

हा प्रकार सुनेच्या निदर्शनास आला. तिने सासूला मारहाण केली. हा प्रकार पतीसमोरच घडला. हा हायव्होल्टेज ड्रामा पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सर्वांना खाक्या दाखवत बंडगार्डन पोलिस ठाण्याचे मार्शल आणि दामिनी पथकास बोलावून त्यांची रवानगी केली. तसेच, भरोसा सेलमध्ये कायदा हातात घेणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील दिला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news