Grampanchayat Result : जिल्ह्यात अजित पवार गटाची सरशी

Grampanchayat Result : जिल्ह्यात अजित पवार गटाची सरशी
Published on
Updated on

पुणे : जिल्ह्यातील 186 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) बाजी मारली. 158 ग्रामपंचायतींत सत्ता मिळविल्याचा दावा या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यात वर्चस्व राखले. काटेवाडीसह तालुक्यातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने विजय मिळविला. इंदापुरातही राष्ट्रवादीने बाजी मारली, तर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील त्यांचा बावडा हा गड राखण्यात यशस्वी ठरले.

आंबेगाव तालुक्यात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने चांगले यश मिळविले. परंतु, वळसे पाटील यांच्या निरगुडसर या गावात राष्ट्रवादीचा सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. शिरूर तालुक्यातील रांजगणगाव गणपतीसह बहुतांश ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वचर्स्व मिळविले. काही ठिकाणी भाजपने विजय साकारला.

शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) या निवडणुकीत आंबेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी विजय मिळविला. प्रतिष्ठेची निरगुडसर सरपंचपदाची निवडणूक शिंदे गटाने जिंकली. पुरंदर, भोर, मुळशी तालुक्यात काँग्रेसने वर्चस्व राखल्याचा दावा केला आहे. खेडमध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news