Phobias and Treatment: मुलांमधील फोबिया आणि आयुर्वेदिक उपचार

Phobias and Treatment
Phobias and Treatment
Published on
Updated on

फोबिया' हा विकार सुशिक्षित आणि खूप चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या पालकांच्या मुलांमध्ये वाढत्या संख्येने आढळून येत आहे.

आपला मुलगा/मुलगी 'प्रिन्स किंवा प्रिन्सेस' आहे, अशी त्यांच्या आईवडिलांनी समजूत करून दिली की, त्यांच्यामध्ये स्वत:बद्दल खोटा अहंकार निर्माण होतो. त्या मुलांना आपण कोणीतरी इतरांपेक्षा खूप मोठे आहोत, असे वाटू लागते. अशी मुले तुलनेने हुशार असतात, अभ्यासात मागे पडत नाहीत. पण कोणीतरी गमतीदार छोटा छोटा हट्ट आपल्या पालकांनी, जवळच्या मंडळींनी पुरवावा, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यांना मित्र मंडळी तुलनेने खूप कमी असतात. अशी फोबिया असणारी मुले शरीराने गुटगुटीत स्वरूपाची असतात. हा विकार काही काळ टिकतो. त्यानंतर काही मंडळींचे वय जसजसे वाढत जाते तसतसे सौम्य स्वरूपाच्या उन्मादात तरी रूपांतर होते किंवा त्यांना भ्रमिष्टावस्था येते. सुरुवातीला पालक लाड लाड करून दुर्लक्ष करतात. (Phobias and Treatment)

Phobias and Treatment: मानसिक दृष्ट्या न दुखवता उपचार आवश्यक

या रुग्णांवर उपचार करताना मानसिक दृष्ट्या न दुखवता, वस्तुस्थितीची, प्रत्यक्ष व्यवहाराची जाणीव करून देणे गरजेचे असते. यासाठी सुरुवातीच्या काळात पालकांनी वेळच्या वेळी या लहान बालकांना सक्तीने सूर्यनमस्कार, पळणे, छोटे व्यायाम, इतर मुलांच्यात खेळणे असे केले तर फोबिया विकार वर्षभरात नाहीसा होऊ शकतो. वरील व्यायामाव्यतिरिक्त स्थूल बालकांकरिता त्रिफळागुग्गुळ, गोक्षुरादि, चंद्रप्रभा, ब्राह्यीवटी अशा गोळ्या प्रत्येकी तीन-दोन वेळी द्याव्यात. सायंकाळी लवकर जेवण द्यावे. जेवणानंतर आठवणीने फिरावयास न्यावे. सर्वतर्‍हेची मिठाई, जडान्न टाळावे. पालकांनी आणि घरातील इतर मंडळींनी फोबियाग्रस्त मुलांसारखाच अल्प पचावयास हलका, असाच आहार घ्यावा. जसजसे वय वाढत जाईल तसतसे या मुलांचे बौद्धिक ताणतणावाचे काम वाढते. त्यांच्या वाढत्या आत्ममग्नतेमुळे ही मुले अभ्यासात मागे पडतात. इथे पालकांचे लक्ष हवे. (Phobias and Treatment)

सात्त्विक आणि पचावयास हलका असा आहार आवश्यक

अशा मुलांना 'सप्लिमेंटरी ब्रेन टॉनिक' म्हणून सारस्वतारिष्ट, ब्राह्यीप्राश यांची जोड द्यावी. नाकात टाकावयास अणु तेलाचे दोन थेंब नियमितपणे वापरावयास सांगावे. पंचगव्यघृताची मदत घ्यावी. सर्वांगाला विशेषत: कानशिले, कपाळ यांना चंदनबलालाक्षादि तेलाचे अभ्यंग करावे. यातील मुख्य पथ्य म्हणजे चरबी वाढणार नाही असा सात्त्विक आणि पचावयास हलका आहार. याखेरीज ज्वारीची भाकरी, मूग, बटाटे, रताळे सोडून शक्यतो उकडलेल्या सर्वभाज्या, पचावयास हलकी फळे उदा. संत्रे, ताडगोळे, पांढरे खरबूज, पोपई, बोरे, लिंबू सरबत, कोकम सरबत यांचे सेवन करावे. मेवा मिठाई, बेकरी पदार्थ, भेळ, मिसळ, वडापाव असे बाहेरचे खाद्यपदार्थ, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम, मांसाहार हे कटाक्षाने टाळावे. (Phobias and Treatment)

या गोष्टीत मन आणि शरीर गुंतवावे

वयोमानानुसार किमान सहा ते बारा सूर्यनमस्कार, दोरीच्या उड्या, शक्य असल्यास छोटेसे बागकाम, पळणे इत्यादी व्यायाम करावा. या रुग्णांना मलावरोधाची तक्रार असल्यास तज्ज्ञांचे देखरेखीखाली तेलाची पिचकारी-मात्रा बस्ती द्यावी. तसेच शिरोपिचू, शिरोधारा, कानशिले, कपाळ, तळहात तळपायांना हलक्या हाताने चंदनबाला लाक्षदि तेलाने मसाज करून घेतल्यास लाभदायक ठरते. या उपचारांसाठी चिकित्साकाळ किमान 6 महिने आहे.  निसर्गोपचारांचा विचार करता फोबियाग्रस्तांनी खो खो, हुतूतू, लंगडी, दोरीच्या उड्या अशा देशी खेळात मन आणि शरीर गुंतवावे. (Phobias and Treatment)

फोबियाकडे दुर्लक्ष केल्यास बालकांचे भविष्य अंधकारमय

संकीर्ण : फोबिया विकाराकडे पालकांनी दुर्लक्ष केले, तर त्या बालकांचे भविष्य अंधकारमय होऊ शकते हे सुजाण पालकांना मी सांगावयास नको. अशा मुलांना प्रयत्नपूर्वक इतर सवंगड्याबरोबर खेळायला मिसळायला लावणे, हा एक खात्रीचा उपाय आहे. आधुनिक वैद्यकातील 'झोपणारी गुंगी आणणारी ब्रेन टॉनिक' कटाक्षाने टाळावीत. फालतू तपासण्या करवून घेऊ नये. ब्राह्यी-सरस्वतीवर विश्वास ठेवावा. (Phobias and Treatment)

संबंधित बातम्या 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news