Pune Ramwadi Ubale Nagar Metro: रामवाडी-उबाळेनगर मेट्रो विस्ताराचा मार्ग मोकळा; सुधारित आराखड्याला अंतिम मंजुरीची प्रतीक्षा

डीपी सेंटर लाइननुसार मेट्रोमार्गिकेत बदल; दुमजली रस्ता, भूसंपादन आणि रस्ता रुंदीकरणाला मिळणार गती
Pune Metro
Pune Metro Pudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: रामवाडी ते उबाळेनगर (विमानतळ मार्ग) या मेट्रोमार्गिकेच्या विस्तारीकरणाचा मार्ग आता सुकर होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या सुधारित सर्वसाधारण आराखड्याला अंतिम मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, महामेट्रोने सुधारित आराखडा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे सादर केला आहे. त्यास मान्यता देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Pune Metro
Pune Women Safety: पुण्यातील २४ निर्जनस्थळे अजूनही अंधारात; महिलांच्या सुरक्षेच्या घोषणांना महापालिकेचा ‘खो-खो’!

महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) निश्चित केलेल्या रस्त्यांच्या 'सेंटर लाइन'नुसार मेट्रोमार्गिका आणि प्रस्तावित उन्नत मार्गात आवश्यक बदल करण्यात आले आहेत. याबाबत आयुक्त राम आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत महापालिकेत दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली होती.

Pune Metro
Ambegaon Wild Vegetables: सह्याद्रीच्या कुशीत रानभाज्यांची मेजवानी

रामवाडी-उबाळेनगर मार्गावर मेट्रोसोबत दुमजली रस्त्याची रचना प्रस्तावित आहे. मात्र, काही भागांत मेट्रोमार्गिका डीपीच्या मध्यरेषेशी जुळत नसल्याचे निदर्शनास आले. विशेषतः वळणाच्या ठिकाणी डबल डेकरची रचना आणि कॅन्टिलिव्हर पियर उभारणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने महामेट्रोने त्या भागांचा आराखडा बदलला आहे.

Pune Metro
Ghod Dam latest news: घोड नदीतील बंधारे कोरडेठाक! शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाईचे संकट; इनामगाव परिसरातील स्थिती

महापालिकेकडून प्राप्त 'डीपी लाइन' मार्किंगच्या आधारे सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून, त्याला अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर 'डीपी लाइन'च्या दोन्ही बाजूंना भूसंपादन व रस्ता रुंदीकरणाची कामे गतीने करावी लागणार आहेत.

Pune Metro
Dragon Fruit Farming: “पाऊस कमी, रोगराई वाढली अन् उत्पादन घटले! ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा बुडाला”

या विस्तारीकरणासाठी कंत्राटदाराची नियुक्ती यापूर्वीच झाली असून प्राथमिक कामांनाही सुरुवात झाली आहे. विमानतळ मेट्रो स्टेशनजवळील एचसीएमटीआर क्रॉसिंगबाबतही महापालिकेकडून महामेट्रोला पत्र मिळाले असून, त्यावर कार्यवाही सुरू आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आराखडा मंजुरी, भूसंपादन आणि रस्ता रुंदीकरण या तिन्ही बाबींमध्ये दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news