Pune October Temperature: पुण्यात ऑक्टोबरमध्ये उन्हाचा कहर; १२७ वर्षांतील तिसऱ्या सर्वोच्च तापमानाची नोंद!

शिवाजीनगरमध्ये पारा ३६ अंशांवर; अल-निनो, कोरडी हवा आणि मान्सूनचे वेळेआधी निर्गमन यांचा परिणाम
Heatwave
HeatwavePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच पुणे शहरात कमालीचा उन्हाळा जाणवत आहे. नागरिकांना मार्च-एप्रिलसारख्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. रविवारी (दि. ११) शिवाजीनगर भागात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचले. गत १२७ वर्षांतील तिसरे विक्रमी तापमान म्हणून नोंद झाली आहे. याआधी ८ ऑक्टोबर १८९९ रोजी ३७.८, तर ७ ऑक्टोबर २००२ मध्ये ३६.९ अंशांची नोंद झाली. त्यानंतर ११ ऑक्टोबर २०२६ रोजी शहराचा पारा ३६ अंशांवर गेला आहे.

Heatwave
Someshwar Sugar Factory Election Result: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची आघाडी; संग्राम सोरटे यांचा विजय

यंदा शहरात मान्सून हंगामात सरासरी ७१० मि.मी. पाऊस झाला. देशात पुणे शहर सर्वांत भाग्यवान ठरले; कारण नाशिकनंतर पुणे शहरातच इतका पाऊस यंदा झाला आहे. सरासरीपेक्षा ३४ टक्के पाऊस होणारे पुणे हे नाशिकनंतरचे दुसरे शहर ठरले आहे. जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये शहरात सरासरीपेक्षा ६० टक्के कमी पाऊस झाला.

Heatwave
Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: निंबूत-खंडाळा गटात अजितदादा पवार पॅनलचा विजय

ऑक्टोबरमधील दुसरे सर्वोच्च तापमान

यंदा २००२ नंतर प्रथमच पुणे शहर आणि जिल्हा ऑक्टोबरमध्ये इतका तापला आहे. या महिन्यात सरासरी तापमान ३२ ते ३४ अंशांवर पोहोचले आहे. ७ ऑक्टोबर २००२ रोजी शहराचा पारा ३६.९ अंशांवर गेला होता.

Heatwave
Voter List Deletion Applications: मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी आता १० अर्जांची मर्यादा; ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्जांची पडताळणी कशी होणार?

गत १०० वर्षांतील ऑक्टोबर महिन्याचा आढावा

  • पुण्याच्या हवामान नोंदीच्या इतिहासानुसार ऑक्टोबर महिन्यात तापमान ३६ अंश किंवा त्याहून अधिक जाणे ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते.

  • चालू शतकात आणि गत शतकात काही विशिष्ट वर्षांत ऑक्टोबरमध्ये ३६ अंशांचा टप्पा ओलांडला.

  • पुण्याच्या हवामान खात्याच्या इतिहासानुसार ऑक्टोबर महिन्यातील सर्वोच्च तापमान ८ ऑक्टोबर १८९९ रोजी ३७.८ अंश एवढे नोंदवले गेले होते.

  • ७ ऑक्टोबर २००२ रोजी शिवाजीनगरमध्ये तापमान ३६.९ अंशांवर गेले होते.

  • २०१५ ते २०२५ दरम्यान तापमान अनेकदा ३४ ते ३५.६ अंशांदरम्यान राहिले. परंतु, शिवाजीनगर केंद्रावर यंदाप्रमाणे ३६ अंशांजवळ पारा पोहोचला नव्हता.

Heatwave
MPSC Students Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ८० वर्षीय मालन आजींचा पाठिंबा; चारधाम यात्रा सोडून पुण्यात दाखल
  • यंदा ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात लोहगावसह इतर उपनगरांनी ३६.६, तर मुख्य शहरातही पारा ३६ अंशांवर पोहोचल्याने हा गेल्या दोन दशकांतील सर्वांत तीव्र ऑक्टोबर ठरला आहे.

  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीतज्ज्ञांच्या अभ्यासातून समोर आलेली कारणे

  • अल-निनोची पार्श्वभूमी सक्रिय आहे. त्यामुळे यंदा मान्सूननंतरचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढले.

  • सध्या उत्तर-पश्चिम भारतावर निर्माण झालेल्या प्रति-चक्रवातीय स्थितीमुळे हवेतील आर्द्रता झपाट्याने कमी झाली आहे. ही प्रणाली कोरडी हवा खेचून आणत असल्याने आकाश पूर्णपणे निरभ्र राहिले आहे.

  • पुण्यातून यंदा मान्सूनचे निर्गमन वेळेपूर्वी ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान झाले. मान्सून वारे थांबल्यामुळे आणि दुपारच्या वेळी कडक ऊन पडत असल्याने थेट सौरऊर्जेमुळे जमीन लवकर तापत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news