

नारायणगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आळेफाटा-पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा येथे भीषण अपघातात एक जणांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव शिवाजी राजू शेळके (वय ५३) असल्याचे समजते. या आपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २३) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
दुचाकीस्वार आळेफाट्याकडून बोटा गावाकडे चालला होता, तर डंपर पुण्याच्या दिशेला चालला होता. डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाहन पलटी होताना त्याखाली दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. डंपर चालकास आळेफाटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान आळेफाटा महामार्गाचे काम संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे असे अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षण यशवंत नलावडे करीत आहेत.
हेही वाचा