Pune Crime: वडगाव बुद्रुकमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून सलूनचालकाचा खून

दोघांतील वादातून धारदार हत्याराने 14 वार; आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
Immoral Relation Murder
Immoral Relation MurderPudhari
Published on
Updated on

पुणे: अनैतिक संबंधांच्या संशयातून एकाने सलूनचालक तरुणावर धारदार हत्याराने वार करून त्याचा निर्घृण खून केला. रूपेश सुरेश भांदिर्गे (वय 41, रा. स्पंदन बिल्डिंग, नऱ्हे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Immoral Relation Murder
Elephanta Caves Discovery: एलिफंटा लेण्यांजवळ 1500 वर्षांपूर्वीची उद्योगनगरी सापडली; मोठा पुरातत्त्वीय शोध

याबाबत रूपेश यांचा भाऊ नीलेश सुरेश भांदिर्गे (वय 38, रा. वारजे) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी युवराज गेजगे (रा. रेणुकानगरी, वडगाव बुद्रुक) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. ही घटना वडगाव बुद्रुक येथील विकास कृष्णा दांगट यांच्या घरासमोर रविवारी (दि.17 मे) रात्री दहा वाजता घडली.

Immoral Relation Murder
Baramati Politics: बारामतीत पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीची राजकीय चुरस?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवराज गेजगे याला आपल्या पत्नीसोबत रूपेश याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरून दोघांमध्ये यापूर्वी वाद झाले होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये समेट होऊन त्यांनी हे प्रकरण मिटविले होते. तरीही या गोष्टीचा राग युवराज याच्या मनात होता. रूपेश हा वडगाव परिसरातील विकास दांगट यांच्या घरासमोर रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आला होता. त्यावेळी युवराजने त्याला तेथे गाठले. दोघांमध्ये वादावादी झाली.

Immoral Relation Murder
Pune Crime: पुण्यात 24 तासांत दोन खून, दोन खुनी हल्ले; शहरात भीतीचे वातावरण

तेव्हा युवराज याने आपल्याकडील धारदार हत्याराने रूपेश यांच्यावर एकामागून सपासप वार केले. त्याच्या मानेवर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर असे तब्बल चौदा वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. गंभीर दुखापत झाल्यामुळे रूपेश यांचा जागीच मृत्यू झाला.

Immoral Relation Murder
Pune NEET Paper Leak: पुणे महापालिकेत ‘नीट’ पेपरफुटीवरून गदारोळ; मॉडर्न कॉलेजवर कारवाईची मागणी

घटनेनंतर आरोपी युवराज गेजगे घटनास्थळावरून फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रूपेश यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपी युवराज याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर करपे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news