Elephanta Caves Discovery: एलिफंटा लेण्यांजवळ 1500 वर्षांपूर्वीची उद्योगनगरी सापडली; मोठा पुरातत्त्वीय शोध

समुद्रकिनारी प्राचीन पॉटरी उद्योग, गोदामे व जलसंचय यंत्रणा आढळली; भारताच्या इतिहासाला नवे पुरावे मिळाले
Elephanta Caves Discovery
Elephanta Caves DiscoveryPudhari
Published on
Updated on

पुणे: मुंबईतील घारापुरी अर्थात एलिफंटा लेणीजवळ समुद्राच्या काठावर तब्बल तेराशे ते पंधराशे वर्षे जुनी उद्योगनगरी सापडली आहे. या ठिकाणी पॉटरी उद्योग (मातीच्या भांड्यांचा कारखाना), त्या काळातील वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आणि माल साठवणुकीची गोदामे सापडली आहेत.

Elephanta Caves Discovery
Baramati Politics: बारामतीत पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीची राजकीय चुरस?

मान्सून लवकर येण्याचे वेध लागल्याने ही सापडलेली भांडी आणि अनेक वस्तू हलवण्याचे काम वेगाने सुरू आहे. खोदकाम करताना काही भग्नावशेष जोडणारी टीम राज्यभरातून आली आहे. तुटलेल्या भांड्यांचे अवशेष शोधून त्यांच्यावर नंबर टाकून ते जोडण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणाहून विदेशात जहाजाने व्यापार केला जात असावा, असे पुरावेहाती आले आहेत.

Elephanta Caves Discovery
Pune Crime: पुण्यात 24 तासांत दोन खून, दोन खुनी हल्ले; शहरात भीतीचे वातावरण

यात मातीची सुंदर भांडी, स्टोन ज्वेलरीचे पुरावे सापडले आहेत. ते गोळा करण्याचे काम सुरू आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने या भागात एकूण पाच ठिकाणी उत्खनन करण्याची मोहीम नोव्हेंबर 2025 पासून सुरू केली. तब्बल सहा महिने काम केल्यानंतर मे 2026 मध्ये पाचही ठिकाणी मोठे यश आले आहे. या ठिकाणी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेकडो मातीची भांडी सापडली.

Elephanta Caves Discovery
Pune NEET Paper Leak: पुणे महापालिकेत ‘नीट’ पेपरफुटीवरून गदारोळ; मॉडर्न कॉलेजवर कारवाईची मागणी

काही भांडी तुटलेली, तर काही सुस्थितीत आहेत. तसेच, त्या काळातील पाणी साठवण यंत्रणा, पाण्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा, मण्यांच्या माळा सापडल्या. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, हे नगर एलिफंटा लेणीजवळ आहे. त्यामुळे हे अवशेष किमान तेराशे ते पंधराशे वर्षांपूर्वीचे असावेत. ते समुद्राच्या काठावर वसलेले असल्याने पाण्याखाली गाडले गेले असावे.

Elephanta Caves Discovery
Pune Organ Transplant Growth: पुणे विभागात अवयव प्रत्यारोपणात मोठी वाढ; रुग्णांना मिळतेय नवसंजीवनी

अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व विभाग, मुंबई खोदकामात काय सापडले?

  • लोकेशन एक: तपकिरी रंगाचे मोठे हौद

  • लोकेशन दोन: मातीच्या विटांनी बांधलेली गोदामे (वेअर हाऊस)

  • लोकेशन तीन: निवासी संकुले

  • लोकेशन चार: जहाजांवर लक्ष ठेवणारे टॉवर

  • लोकेशन पाच: स्टोन ज्वेलरी (दगडी मण्यांचे कारखाने)

समुद्राच्या काठावर एलिफंटा लेणीजवळ एकूण पाच ठिकाणांची निवड करून नोव्हेंबरमध्ये उत्खनन सुरू झाले. मे महिन्याच्या सुरुवातीला या ठिकाणी सुमारे पंधराशे वर्षे जुनी उद्योगनगरी सापडली आहे. या ठिकाणी मातीच्या भांड्यांचे कारखाने असावेत. पाचही लोकेशनवर खूप वेगळ्या गोष्टी सापडल्या आहेत. काही ठिकाणी स्टोन ज्वेलरी सापडली, त्यामुळे येथून विदेशात जहाजाने व्यापार होत असावा.

अभिजित आंबेकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news