Baramati Politics: बारामतीत पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीची राजकीय चुरस?

पार्थ, जय, रोहित आणि युगेंद्र पवार यांच्याभोवती फिरतेय बारामतीच्या वारशाची चर्चा; राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल
Pawar Brother's
Pawar Brother'sPudhari
Published on
Updated on

प्रा. अनिल धुमाळ

शिवनगर: अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या राजकीय वारशावर हक्क सांगण्यासाठी पवार कुटुंबातील तिसरी पिढी आमने-सामने उभी ठाकली आहे का? अशी चर्चा सध्या रंगली आहे. पवार घराण्यातील अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि जय, पुतणे आमदार रोहित पवार, तसेच युगेंद्र पवार या चार तरुण चेहऱ्यांभोवती सध्या बारामती आणि पर्यायाने राज्याचे राजकारण फिरताना दिसत आहे.

Pawar Brother's
Pune Crime: पुण्यात 24 तासांत दोन खून, दोन खुनी हल्ले; शहरात भीतीचे वातावरण

बारामती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू,आजवर या मतदारसंघाने ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यानंतर अजित पवार यांचे एकछत्री सामाज्य पाहिले. मात्र, आता अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीचा विस्कटलेला राजकीय पट पुन्हा मांडला जात आहे. अजितदादांच्या पश्चात बारामतीवर नेमका कोणाचा झेंडा फडकणार, राष्ट्रवादीचा गड म्हणून ओळखले जाणाऱ्या या मतदारसंघात आता कोणती ‌‘पवारशाही‌’ चालणार, यावरून ‌‘पवार‌’घराण्यातच अंतर्गत सुप्त संघर्षाची ठिणगी पडली आहे.

Pawar Brother's
Pune NEET Paper Leak: पुणे महापालिकेत ‘नीट’ पेपरफुटीवरून गदारोळ; मॉडर्न कॉलेजवर कारवाईची मागणी

सध्या राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर एक नवी चर्चा रंगते आहे. एकूणच अजितदादांच्या निधनानंतर बारामतीचा दादा कोण? तसेच पवार आडनावाचा खरा वारसदार कोण? अशी चर्चा रंगताना दिसत आहे. बारामतीच्या सत्तेच्या चाव्या सध्या कोणत्याही एका तरुणाच्या हातात सहज जाणाऱ्या नाहीत. रोहित पवारांची राज्यव्यापी महत्त्वाकांक्षा, पार्थ पवारांचे देश पातळीवरील पक्षाचे नेतृत्व, युगेंद्र पवारांची बारामतीतील सुप्त तयारी आणि जय पवारांना असणारा वडिलांच्या सामाज्याचा पाठिंबा या चार जणांचा संघर्ष आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरेल, यात शंका नाही.

Pawar Brother's
Pune Organ Transplant Growth: पुणे विभागात अवयव प्रत्यारोपणात मोठी वाढ; रुग्णांना मिळतेय नवसंजीवनी

पार्थ पवार हे अजितदादांचे ज्येष्ठ चिरंजीव सध्या ते बारामतीच्या राजकारणात फारसे सक्रिय दिसत नसले, तरी राज्यसभेचे खासदार म्हणून पक्षाने दिलेली संधी आणि पक्षावर पकड निर्माण करण्याची त्यांची सुरू असलेली हालचाल पाहता ते अजितदादांच्या वारसा हक्काने मिळालेली जबाबदारी ते बारामतीच्या जनतेवर पकड निर्माण करण्यासाठी वापरतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. जय पवार अजित पवारांचे धाकटे पुत्र हे आतापर्यंत पडद्यामागून निवडणुकीचे व्यवस्थापन पाहत होते. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत ते थेट जनतेत उतरले आहेत. अजित पवारांची हुबेहूब कार्यपद्धती, कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आणि ‌’‌‘दादां‌’च्या विकासकामांचा थेट वारसा हे त्यांचे बळ आहे.

Pawar Brother's
Pune Hapus Mango: कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात; कर्नाटक हापूसची आवक वाढली

रोहित पवार हे अजित पवार यांचे पुतणे कर्जत-जामखेडमधून आमदार असले, तरी बारामतीच्या राजकारणात त्यांचा राबता आणि पक्षातील त्यांची आक्रमक भूमिका लपून राहिलेली नाही. वक्तृत्व, आक्रमकपणा आणि शरद पवारांचा थेट वरदहस्त ही त्यांची बलस्थाने आहेत. बारामतीची स्थानिक गणिते आतापर्यंत अजित पवारांच्या नियंत्रणातच होती, त्यामुळे रोहित पवार यांना तिथे थेट पकड निर्माण करण्यासाठी अंतर्गत संघर्षाचा सामना करावा लागत आहे. युगेंद्र पवार अजित पवारांचे सख्खे पुतणे सध्या ते बारामतीत शरद पवार गटाचे नेतृत्व करतात, बारामतीच्या स्थानिक लोकांशी संस्थांशी जोडलेली नाळ, तसेच शरद पवारांनी त्यांना बारामती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‌‘ग््रााउंड लेव्हल‌’वर ताकद दिली आहे. याचा उपयोग किती होईल, हे येणारा काळ ठरवेल.

...तर मग लढाई फेसबुक पुरती राहणार नाही

बारामतीची जनता ही भावनिकतेला जशी साद घालते, तशीच ती विकासालाही महत्त्व देते. अजित पवारांनी बारामतीचा केलेला कायापालट कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे भविष्यात जर ही चौकोनी लढाई उघड झाली, तर ती केवळ फेसबुक किंवा व्हॉट्‌‍सॲप पुरती मर्यादित राहणार नाही, हे मात्र नक्की!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news