Pune NEET Paper Leak: पुणे महापालिकेत ‘नीट’ पेपरफुटीवरून गदारोळ; मॉडर्न कॉलेजवर कारवाईची मागणी

प्राध्यापिकेच्या अटकेनंतर विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल; सभागृहात घोषणाबाजी, तहकुबीची मागणी
NEET Paper Leak Case
NEET Paper Leak Casepudhari photo
Published on
Updated on

पुणे: ‌’नीट‌’ पेपरफुटीचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. सरस्वतीच्या मंदिरात भष्टाचाराचा चिखल साचल्याचा आरोप करत काँग््रेास आणि राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार पक्ष), शिवसेना उद्धव ठाकरे पक्षांनी भाजपला धारेवर धरले. नीट पेपर फुटीप्रकरणी मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक झाल्याने काँग््रेास व राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार पक्षाच्या नगरसेवकांनी महापौर मंजूषा नागपुरे यांच्यासमोर निषेधाचे फलक धरत घोषणाबाजी केली. तसेच मॉडर्न कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी करत प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते.

NEET Paper Leak Case
Pune Organ Transplant Growth: पुणे विभागात अवयव प्रत्यारोपणात मोठी वाढ; रुग्णांना मिळतेय नवसंजीवनी

नीट पेपरफुटीप्रकरणी पुण्यातून मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली आहे. मांढरे ज्या मॉडर्न कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत, त्या कॉलेजच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे या नगरसेविका असून, शिक्षण समितीच्या सदस्या देखील आहेत. त्यामुळे सभागृह सुरू होताच काँग््रेासचे गटनेते चंदूशेठ कदम, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, तर राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार पक्षाचे गटनेते काकासाहेब चव्हाण व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते नितीन गावडे यांनी आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी सुरू केली.

NEET Paper Leak Case
Pune Hapus Mango: कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात; कर्नाटक हापूसची आवक वाढली

‌‘सरस्वतीच्या मंदिरात कळेना चोर कुठले, साव कुठले; लक्ष्मीच्या दर्शनानेच परीक्षेचे पेपर फुटले!‌‘, ‌‘राजीनामा द्या, राजीनामा द्या, शिक्षणमंत्री राजीनामा द्या‌‘, ‌‘मॉडर्न कॉलेजची मान्यता रद्द करा‌‘, “विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पाणी, मॉडर्नची कमाई” अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेले. भाजपच्या नगरसेविका आणि मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी “हा केंद्र सरकारचा विषय असून, सीबीआयने वेळीच पावले उचलल्याने कारवाई झाली आहे. त्यामुळे येथे आंदोलन करू नये,” असे आवाहन केले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत विरोधकांनी आंदोलन सुरूच ठेवले.

NEET Paper Leak Case
Miraj Kolhapur Railway Double Line: मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्ग दुहेरीकरणाला गती; प्रवास होणार वेगवान

काँग््रेास व राष्ट्रवादीच्या या गोंधळावर भाजप नगरसेवकांनी देखील आक्रमक भूमिका घेत काँग््रेासवर गंभीर आरोप केले. भाजपचे नगरसेवक पुनीत जोशी यांनी सर्वाधिक खोटे डॉक्टर काँग््रेासच्या काळात तयार झाल्याचा आरोप केला, तर स्वरदा बापट यांनी सभागृहाचा वेळ वाया जात असल्याने काँग््रेास नगरसेवकांना समज देण्याची मागणी करत सभागृह व्यवस्थित चालू द्यावे, अशी मागणी केली.नीट पेपरफुटी आणि त्यानंतर चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ सर्वसाधारण सभा तहकूब करावी, अशी तहकुबी सूचना काँग््रेास आणि राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाने मांडली. मात्र, भाजपने बहुमताच्या जोरावर ही तहकुबी सूचना फेटाळून लावली.

NEET Paper Leak Case
Teacher Recruitment Pavitra Portal: पवित्र पोर्टल शिक्षक भरतीला गती; 31 मे 2026 पर्यंत जाहिरातींची अंतिम मुदत

‌‘महाविकास आघाडी‌’ एकत्र, तर राष्ट्रवादी कॉंग््रेास तटस्थ

आंदोलनात काँग््रेाससोबतच राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार पक्ष), शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष देखील सामील झाला होता. परीक्षेचे पेपर फोडून विद्यार्थ्यांना अंधारात ढकलणाऱ्यांना पाठीशी का घालता? असा सवाल विचारत विरोधकांनी शिक्षण समितीच्या भाजप सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या भष्टाचारात भाजपचे पदाधिकारी सामील असल्याचा संशय व्यक्त करत विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली, ज्यामुळे सभेचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग््रेासने तटस्थ भूमिका घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news