

पुणे: मी जागतिक दर्जाचा वेटलिफ्टर. सन 2021 मध्ये आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले. आईचा आग््राह अभ्यासासाठी असायचा, म्हणून अभ्यासही खूप केला. बीएस्सी, एमबीए केले. पण, वाडिलांचा आग््राह व्यायामाचा असायचा.
पैशाच्या मागे न लागता आपण समाजासाठी काही देणे लागतो, या विचाराने महापालिका निवडणूक लढवली आणि भाजपच्या विजयरथाला बेक लावला, अशी भावना पुणे महापालिका निवडणुकीत विजय मिळविणारे गौरव घुले यांनी दै. ’पुढारी’शी संवाद साधताना व्यक्त केली.
प्रभाग 20 शंकर महाराज मठ-बिबवेवाडी हा भाग आहे. याच भागात लहानाचे मोठे झालेल्या गौरव घुले यांनी नगरसेवकाचे स्वप्न पहिले ते 2017 च्या निवडणुकीत. त्या वेळी वडिलांनी आग््राह केल्याने भाजपच्या तिकिटावर ते निवडणुकीला उभे राहिले. मात्र, 1100 मतांनी पराभव झाला असे गौरव घुले यांनी सांगितले.
या त्रिवेणी संगमाचा झाला फायदा
उत्तम शिक्षण, जागतिक दर्जाचा खेळाडू आणि उत्तम व्यावसायिक, असा त्रिवेणी संगम असल्याने गौरव यांना 2026 ची निवडणूक जड गेली नाही. भाजपच्या तिकिटाची वाट बघत असतो, तर हे यश नसते मिळाले, अशी प्रांजल कबुली देत ते म्हणाले, त्या पक्षात प्रचंड चुरस असल्याने या वेळी मला राष्ट्रवादी कॉंग््रेासने संधी दिली. त्यामुळे मला लोकसंपर्क आणि त्यांची कामे करायला वेळ मिळाला. त्याउलट समोरच्या उमेदवाराला माझ्या तुलनेत कमी वेळ मिळाला. वडिलांचा सर्व समाजातील जबरदस्त जनसंपर्क, कृषी उत्पन्न बाजार समितीतील त्यांचा अनुभव आणि व्यापारी मंडळींशी असलेला स्नेह खूप कामी आला. एक माणूस म्हणून समाजात 2021 पासून वावर सुरू असल्याने मला निवडणुकीत मताधिक्य देखील चांगले मिळाले.
प्रभाग 20 ’ड’मधून राष्ट्रवादी काँग््रेासचे उमेदवार घुले यांचा विकासाचा संकल्प
गौरव घुले यांची दूरदृष्टी आणि संकल्प
संपूर्ण प्रभाग सीसीटीव्हीच्या अखत्यारीत आणणार, ज्यामुळे गुन्हेगारी रोखण्यास मोठी मदत होईल.
प्रभागात उत्तम आरोग्य, उत्तम शिक्षणासाठी चांगले रुग्णालय, चांगल्या शाळा तयार करणार.
मी स्वत: क्रीडापटू असल्याने तरुणांसाठी सर्व प्रकारचे खेळ आणि त्यासाठी मैदान उपलब्ध करून देणार.