Rajgad Trekker Death: राजगडावर दुर्दैवी घटना; चढाईदरम्यान 21 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू

अतिबिकट गुंजवणे दरवाजा मार्गावर दमछाक, हृदयविकाराच्या झटक्याचा संशय
Rajgad Fort
Rajgad FortPudhari
Published on
Updated on

खडकवासला: राजगड किल्ल्यावर अतिबिकट गुंजवणे दरवाजा मार्गाने चढाई करताना दमछाक झालेल्या 21 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना आज रविवारी (दि. 25) सकाळी दहाच्या सुमारास घडली. नागराज कोरे (वय 21, मूळ रा. बेळगाव कर्नाटक, सध्या रा. पुणे) असे मृताचे नाव आहे. नागराज हा पुण्यातील आपल्या पाच-सहा मित्रांबरोबर राजगडावर फिरण्यासाठी आला होता.

Rajgad Fort
Pune Airport Traffic Growth: पुणे विमानतळाची भरारी; प्रवासी, उड्डाणे व कार्गो वाहतुकीत मोठी वाढ

नागराज व त्याचे सहकारी मित्र गुंजवणे दरवाजा मार्गाने गडावर चढाई करीत होते. गुंजवणे प्रवेशद्वाराच्या खाली अतिबिकट टप्प्यात चढाई करताना नागराजला दम लागला. चक्कर येऊन पडलेल्या नागराजला धीर देऊन उठविले.

Rajgad Fort
Pune Rural Police President Medal: पुणे जिल्ह्याच्या सुपुत्राला राष्ट्रपती पदक; पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचा गौरव

त्यानंतरही त्याने चढाई सुरू ठेवल्याने दम लागून त्याच्या छातीत दुखू लागले. काही वेळातच तो खाली कोसळला. पुरातत्व विभागाचे सुरक्षा रक्षक विशाल पिलावरे यांना माहिती मिळताच स्थानिक युवक गणेश ढेबे, युवराज पाटील समीर कामठे, गणेश दीक्षित तसेच काही पर्यटकांसह त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Rajgad Fort
Gultekdi Flower Market Prices: प्रजासत्ताक दिनामुळे गुलटेकडी फुलबाजारात दरवाढ

दैनिक ‌‘पुढारी‌’ने काम लवकर पूर्ण करण्याबाबत वेधले होते लक्ष

दैनिक ‌‘पुढारी‌’मध्ये आज ‌’राजगडच्या तटबंदीची डागडुजी कधी होणार‌’ अशी शीर्षकाखालील बातमी रविवारी प्रसिद्ध करण्यात आली. ज्यात राजगडच्या तटबंदी डागडुजीचे काम सुरू असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुरातत्व खात्याने चोर दरवाजा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून गुंजवणे दरवाजा मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुरातत्व खात्याने केले आहे. मात्र, तटबंदी डागडुजीच्या कामावर एकच गवंडी काम करीत असल्याने काम संथगतीने सुरू आहे. हे काम वेगाने करून हा मार्ग लवकर खुला करावा, या शिवप्रेमींकडून करण्यात आलेल्या मागणीकडे प्रशासनाचे लक्षही वेधले होते.

Rajgad Fort
Pune Wholesale Market Prices: पुणे घाऊक बाजारात साखर, खाद्यतेल, डाळी महागल्या

रुग्णालयात आणण्यापूर्वीच नागराज चा मृत्यू झाला होता. त्याचे वय अवघे 21 वर्षांचे आहे. अतिबिकट, उंच कड्यातील पायी मार्गाने चढाई करताना दमछाक होऊन तो खाली कोसळला. नंतर पुन्हा उठून तो चढाई करीत असताना त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराने अथवा इतर कारणांमुळे नागराजचा मृत्यू झाला, हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल.

डॉ. ज्ञानेश्वर हिरास, वैद्यकीय अधीक्षक, वेल्हे ग््राामीण रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news