Pune Muddy Water Supply: पुणेकरांनो पाणी जपून प्या! गढूळ पाण्यामुळे महापालिकेचा इशारा; उकळून व तुरटी फिरवून वापरण्याचे आवाहन

पाणी शुद्धीकरण यंत्रणेची मर्यादा उघड; पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता अपुरी, जलजन्य आजारांचा धोका वाढला
Contaminated Water
Contaminated WaterPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणेकरांना सुरक्षित आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेच आपल्या यंत्रणेच्या मर्यादा अधिकृतपणे मान्य केल्याने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीतील पाणी अत्यंत गढूळ झाले असून, ते पूर्णपणे शुद्ध करणे सध्याच्या यंत्रणेला शक्य होत नसल्याची कबुली महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून दिली आहे. शहराच्या विविध भागांत अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी पाण्यात तुरटी फिरवावी, तसेच पाणी उकळून प्यावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Contaminated Water
Pune Waste Processing Project Tender: पुणेकरांच्या खिशावर कचरा प्रकल्पाचा २६५ कोटींचा भार?; निविदेतील वाढीव दरामुळे महापालिका चर्चेत

पुण्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पाण्यात माती देखील वाहून आल्याने अनेक पाण्याचे स्रोत गढूळ झाले आहे. पुण्याला पाणीपुरवठा होणाऱ्या प्रकल्पातून हे पाणी शुद्धीकरण प्रकल्पात येऊनही ते शुद्ध होत नसल्याने पाणी उकळून तसेच पाण्यात तुरटी फिरवून पाणी प्यावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. गंभीर बाब म्हणजे सिंहगड रस्त्यालगतच्या हद्दवाढ झालेल्या गावांमध्ये अद्याप जलशुद्धीकरणासाठी फिल्टर प्लांटच उपलब्ध नसल्याने तेथील नागरिकांना केवळ निर्जंतुकीकरण केलेले नदीचे गढूळ पाणी पुरवले जात असल्याचेही महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट झाले आहे.

Contaminated Water
Forest Department Tree Cutting Controversy: वनविभागाच्याच आवारात नियमांना हरताळ? राजगुरुनगरमध्ये मोठ्या झाडांची कत्तल

पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता अपुरी

धरणांमधून येणाऱ्या कच्च्या पाण्याच्या गढूळपणात (टर्बिडिटी) मोठी वाढ झाली आहे. विशेषतः शहरातील प्रमुख 'जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र' येथे येणाऱ्या पाण्याची गढूळता प्रकल्पाच्या निर्धारित शुद्धीकरण क्षमतेपेक्षा अधिक असल्याने ते पूर्णपणे शुद्ध करणे शक्य होत नसल्याचे महापालिकेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरवर्षी पाणीपुरवठा योजनांवर आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असतानाही ऐन पावसाळ्यातच यंत्रणा अपुरी पडत असल्याचे या पत्रातून स्पष्ट होत आहे.

Contaminated Water
Pune HCMTR Ring Road Project: पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार? एचसीएमटीआर रिंगरोडला महापालिकेचे प्राधान्य; ९ हजार कोटींचा प्रकल्प

नागरिकांवरच खबरदारीची जबाबदारी

पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पिण्याचे पाणी काही काळ स्थिर ठेवण्याचा, त्यात तुरटी फिरवून गढूळ कण तळाशी बसू देण्याचा, त्यानंतर कापडाने गाळून पाणी उकळूनच वापरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, सुरक्षित आणि शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची असताना नागरिकांनाच अशा उपाययोजना करण्याचा सल्ला देण्याची वेळ का आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गॅस्ट्रो, अतिसार, काविळ, टायफॉईड यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढलेला असताना गढूळ पाणीपुरवठ्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Contaminated Water
Addiction Free Maharashtra: ‘सरकार व्यसनमुक्तीऐवजी व्यसनाला प्रोत्साहन देते’; महसुलासाठी दारूविक्री वाढवल्याचा आरोप

शहरात अनेक भागांत दूषित पाण्याच्या पुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी थेट पाणी उकळून प्यावे, तसेच पाण्यात तुरटी फिरवून पाणी प्यावे. पिण्याच्या पाण्यात कोणतेही रोगजनक जीवाणू राहणार नाहीत, यासाठी आवश्यक ती खबरदारी पाणीपुरवठा विभागामार्फत घेतली जात आहे.

नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news