Pune Municipal Corporation Flying Squads: पुणे महापालिकेच्या ‘भरारी पथकां’चा उद्देशच भरकटला; कचऱ्यावर कारवाईऐवजी बैठका, पाहणीसाठी वाहने

इंदूरच्या धर्तीवर घेतलेल्या १८ बोलेरो वाहनांचा वापर; सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेवर तातडीच्या कारवाईचा उद्देश बाजूला
Pune Municipal Corporation Flying Squads
Pune Municipal Corporation Flying SquadsPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, तसेच राडारोडा टाकून अस्वच्छता करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यासाठी पुणे महापालिकेने इंदूरच्या धर्तीवर सुरू केलेल्या भरारी पथकांचा उद्देशच भरकटल्याचे चित्र आहे. या पथकांसाठी खरेदी केलेली १८ बोलेरो वाहने अस्वच्छतेवर कारवाई करण्याऐवजी आरोग्य निरीक्षकांच्या बैठका, परिसर पाहणी आणि संयुक्त कारवायांसाठी वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Municipal Corporation Flying Squads
Ganadhish Navonmesh Competition: ‘गणाधीश नवोन्मेष स्पर्धे’चा जल्लोषात पारितोषिक वितरण सोहळा; नटरंग ॲकॅडमीच्या कलाकारांनी रंगवली सांस्कृतिक मैफल

इंदूरच्या स्वच्छता व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेने डिसेंबर २०२३ मध्ये अभ्यास दौरा केला होता. तेथील स्वच्छता व्यवस्थेत भरारी पथकांच्या पिवळ्या वाहनांची महत्त्वाची भूमिका असल्याचे निदर्शनास आले होते. अस्वच्छता करणाऱ्यांवर जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यासह वाहनावरील ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्याची पद्धत इंदूरमध्ये राबविली जाते. त्याच धर्तीवर पुण्यात भरारी पथके सुरू करण्यात आली.

Pune Municipal Corporation Flying Squads
Pune MPSC Students Protest: पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फूट; शास्त्री रस्ता अन् एस. एम. जोशी पुलावर ठिय्या

जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १८ बोलेरो वाहने उपलब्ध करून देण्यात आली. १५ क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी एक, तर प्लास्टिक पथक, घनकचरा अभियांत्रिकी विभाग आणि स्वच्छता विभागाला प्रत्येकी एक वाहन देण्यात आले. गर्दीची ठिकाणे, चौक, बस, रेल्वे व मेट्रो स्थानके, हॉटेल, टपऱ्या, महाविद्यालये आणि चित्रपटगृहांच्या परिसरात फिरून कारवाई करणे अपेक्षित आहे.

Pune Municipal Corporation Flying Squads
Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पुरुषोत्तम जगतापांना धक्का; अजित पवारांचे नाव-फोटो वापरण्यास मनाई

मात्र, प्रत्यक्षात ही वाहने महापालिका भवन, क्षेत्रीय कार्यालये आणि आरोग्य कोठ्यांच्या परिसरात अधिक दिसत आहेत. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व उपआरोग्य निरीक्षक यांच्या बैठका, परिसर पाहणी आणि संयुक्त कारवायांसाठी त्यांचा वापर होत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी भरारी पथकांची उपस्थिती अपवादानेच दिसते.

Pune Municipal Corporation Flying Squads
Government Hospital Medicine Quality: सरकारी रुग्णालयांतील औषधांवर ‘औषध शोधक’ची नजर; बनावट-निकृष्ट औषधे रोखण्यासाठी विशेष पथक

कार्यक्षेत्राच्या पाहणीसाठी दुचाकी वापरणे अपेक्षित

आरोग्य निरीक्षकांना कार्यक्षेत्राच्या पाहणीसाठी दुचाकी वापरणे अपेक्षित असून, त्यासाठी भत्ताही दिला जातो. तरीही भरारी पथकांच्या वाहनांचा पाहणीसाठी वापर होत आहे. काही ठिकाणी घनकचरा विभाग किंवा क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारीही ही वाहने वापरत असल्याचे दिसून येते. दरम्यान, स्वच्छता मोहिमा, एसओपी, बैठका आणि संयुक्त कारवायांसाठी अनेक कर्मचाऱ्यांना एकत्र जावे लागत असल्याने दुचाकीऐवजी या वाहनांचा वापर केला जात असल्याचे काही आरोग्य निरीक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

भरारी पथकांसाठी १८ वाहने

  • १५ क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी एक वाहन

  • प्लास्टिक पथकाला एक

  • घनकचरा अभियांत्रिकी विभागाला एक

  • स्वच्छता विभागाला एक

  • सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेवर तातडीने कारवाई अपेक्षित

  • प्रत्यक्षात बैठका, पाहणी आणि संयुक्त कारवायांसाठी वापर होत असल्याचे चित्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news