Pune Municipal Fake Recruitment Case: पुणे महापालिकेतील बोगस भरती प्रकरण; बनावट नियुक्तीपत्र देणाऱ्या शिपायाचे निलंबन

महापालिकेचे लेटरहेड, शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर; विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
suspended
suspended Pudhari News Network
Published on
Updated on

पुणे: बोगस भरती प्रकरणी महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. महापालिकेचे लेटरहेड आणि बनावट शिक्क्यांचा वापर करून अनेकांकडून पैसे घेऊन नियुक्ती पत्र दिल्याने प्राथमिक शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद पाटील याला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी विश्रामबागवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

suspended
Mulshi Crime: शेतरस्त्याच्या वादातून तरुणाचा खून; मुळशीतील पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी दिलेल्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने ही कारवाई केली आहे. महापालिकेत नोकरी लावून देतो, असे आश्वासन देऊन अनेकांकडून मोठी रक्कम लाटून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले होते. या बोगस भरती प्रकरणाचा पर्दाफाश माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला होता.

suspended
Pune Crime: बिल कमी करण्याच्या मागणीवरून वाद; पुण्यातील रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टराने समाजसेवकावर पिस्तूल रोखल्याचा आरोप

दरम्यान, या गंभीर प्रकाराची महापालिकेने दखल घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या तपासात शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद पाटील याने महापालिकेचे बनावट लेटरहेड आणि बनावट शिक्क्यांचा वापर करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या तयार केल्या. त्याद्वारे विविध विभागांमध्ये कामाला लावण्यासाठी बनावट नियुक्ती आदेश त्याने दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

suspended
Pune Municipal Hospital Medicine Issue: पुणे महापालिका दवाखान्यांचा धक्कादायक कारभार! कफ सिरपसाठी रुग्णांकडून आणल्या जात होत्या बाटल्या, मलम कागदात

या प्रकारामुळे पुणे महापालिकेची प्रतिमा मलिन झाली असून, संबंधित कर्मचाऱ्याने कर्तव्यात निष्काळजीपणा आणि गैरवर्तन केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. दरम्यान, या कारवाईनंतर पाटील याला पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना महापालिकेचे कार्यक्षेत्र सोडता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

suspended
Pune Flood Rehabilitation: घोषणा हवेतच! सिंहगड रस्त्यावरील १,३८३ कुटुंबांचे पुनर्वसन रखडले; ३०० कोटींचा पूरप्रतिबंधक प्रकल्पही मंत्रालयात अडकला

ही कारवाई गेल्या काही आठवड्यांपासून प्रलंबित होती. या प्रकरणी अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने ही कारवाई करण्यात आली. संबंधित पीडित व्यक्तीशी संपर्क साधण्यात आला, पुरावे गोळा करून त्यांचे विश्लेषण करण्यात आले आणि त्यानंतर पीडित व्यक्तीचे समुपदेशन करून त्यांना या प्रकरणी मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी सहकार्य देण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिपायाला निलंबित करण्यात आले आहे.

प्रजीत नायर, अतिरिक्त आयुक्त महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news