Pune Road Potholes: पुणेकरांना खड्ड्यांतूनच प्रवास; महापालिकेचा ‘खड्डेमुक्त रस्त्यां’चा दावा फेल?

पावसाने प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांची चाळण; खड्डे बुजवल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा उखडत असल्याने नागरिक संतप्त
Road Potholes
Road PotholesPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील रस्ते खड्डेमुक्त केल्याचा दावा महापालिका सातत्याने करीत असली, तरी प्रत्यक्षात शहरातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे वास्तव आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या खड्डादुरुस्तीच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Road Potholes
Pune Ring Road Project: पुणे रिंगरोडच्या कामाला वेग; ४५ टक्के बांधकाम पूर्ण, पश्चिम भाग २०२७ मध्ये खुला होणार

कोट्यवधी रुपये खर्च करूनही खड्ड्यांचा प्रश्न कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, नगर रस्ता, सोलापूर रस्ता, बाणेर, औंध, कोथरूड, हडपसर, कात्रज, वारजे, धायरी तसेच अनेक अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी खड्डे बुजवण्यात आले. मात्र, काही दिवसांतच ते पुन्हा उखडले.

Road Potholes
Nira River Basin Water Storage: निरा नदीखोऱ्यात पावसाची दमदार बरसात; चार धरणांत ४८ टीएमसी, ९९ टक्के पाणीसाठा

पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याच्या घटना वाढत आहेत. महापालिकेकडून खड्डे बुजवण्यासाठी विशेष पथके, कोल्डमिक्स आणि इतर उपाययोजनांचा वापर होत असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अपेक्षित सुधारणा दिसून येत नाही. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही अनेक खड्डे कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Road Potholes
Malegaon Sugar Factory CBG Project: माळेगाव साखर कारखान्याची ‘सीबीजी’कडे झेप; ७५ कोटींच्या प्रकल्पातून शाश्वत ऊर्जानिर्मितीला बळ

दरम्यान, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी नुकतेच अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी करण्याचे, धोकादायक खड्ड्यांची तातडीने नोंद घेण्याचे आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी होऊन पुणेकरांना खड्डेमुक्त रस्ते कधी मिळणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

Road Potholes
Khadakwasla Dam Water Release: खडकवासला साखळी १०० टक्के भरली; मुठा नदीत विसर्ग वाढवला, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

पुणेकरांच्या प्रमुख तक्रारी

  • प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे.

  • खड्डे बुजवल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा उखडत आहेत.

  • पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघातांचा धोका वाढला.

  • दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास.

  • वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या देखभाल खर्चात वाढ.

नागरिकांची मागणी

  • सर्व रस्त्यांचे तातडीने संयुक्त सर्वेक्षण करावे.

  • निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे.

  • कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करावी.

  • खड्डेदुरुस्तीचा सार्वजनिक अहवाल प्रसिद्ध करावा.

  • प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी निश्चित करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news