Pune Fake Doctors Action: पुण्यात बोगस डॉक्टरांवर महापालिकेचा शिकंजा; १३ वर्षांत ५६ गुन्हे दाखल

बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर फौजदारी कारवाई; नागरिकांना डॉक्टरांची नोंदणी तपासण्याचे आवाहन
Doctor Arrested
Doctor ArrestedPudhari
Published on
Updated on

पुणे: सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर पुणे महापालिकेने कारवाईचा पाश आवळला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली 'बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध व कारवाई समिती'ची बैठक पार पडली.

Doctor Arrested
Maharashtra Crop Insurance Scheme 2026: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग घटला; ४० लाखांनी कमी नोंदणी, मुदतवाढीसाठी राज्याचा केंद्राकडे प्रस्ताव

या बैठकीत २०१३ ते २०२६ या कालावधीत शहरात बोगस डॉक्टरांवर करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या काळात शहरातील विविध पोलिस ठाण्यांत एकूण ५६ गुन्हे दाखल केल्याची माहिती देण्यात आली.

Doctor Arrested
Pune Flood Rescue: पुणे पुरात अग्निशमन जवान देवदूत ठरले; नवजात बाळासह आईला सुरक्षित बाहेर काढले

तसेच, प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने के. डी. वाडिया प्रकरणाच्या तपासणीनंतर विधी विभागाचा अभिप्राय घेऊन २७ जुलै रोजी कोंढवा पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

Doctor Arrested
Pune Flood Rescue: पुणे पुरात माणुसकीचा पूर; वृद्धाला वाचवण्यासाठी अग्निशमन जवानांनी कमरेएवढ्या पाण्यातून केली धाव

संबंधित व्यक्तीविरुद्ध 'महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अधिनियम, १९६१'च्या कलम ३३ (१) व ३३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. महापालिकेने स्पष्ट केले की, केवळ मान्यताप्राप्त वैद्यकीय कौन्सिलकडे नोंदणीकृत असलेले पदवीधर एमबीबीएस, बीएचएमएस, बीडीएस, एमडी, एमएस सोडल्यास इतर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीने रुग्णोपचार केल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई केली जाईल.

Doctor Arrested
Pune Flood: पुण्यात पुन्हा पुराचा कहर; एकतानगर पाण्याखाली, सोसायट्यांमध्ये कमरेएवढे पाणी

नागरिकांनी डॉक्टरांची वैध नोंदणी व शैक्षणिक पात्रता तपासूनच उपचार घ्यावेत आणि बोगस डॉक्टरांची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागास द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news