Pune Flood Rescue: पुणे पुरात अग्निशमन जवान देवदूत ठरले; नवजात बाळासह आईला सुरक्षित बाहेर काढले

एकतानगरमध्ये कमरेएवढ्या पाण्यातून रेस्क्यू ऑपरेशन; अवघ्या काही दिवसांच्या बाळाला जवानाने उराशी कवटाळून वाचवले
Pune Flood Rescue
Pune Flood RescuePudhari
Published on
Updated on

पुणे: सिंहगड रस्त्यावरील एकतानगर परिसरात पुराचे पाणी थैमान घालत असताना एका चिमुकल्या नवजात जिवाला आणि त्याच्या आईला सुरक्षित बाहेर काढताना अग्निशमन दलाच्या जवानांनी देवदूतासारखी कामगिरी बजावली.

Pune Flood Rescue
Pune Flood Rescue: पुणे पुरात माणुसकीचा पूर; वृद्धाला वाचवण्यासाठी अग्निशमन जवानांनी कमरेएवढ्या पाण्यातून केली धाव

कमरेएवढ्या साचलेल्या गढूळ पाण्यात जेव्हा मदतीची सर्व दारे बंद वाटत होती तेव्हा जवानांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे एका नवजात बालकाला बाहेर काढण्यात यश आले. धरणातून सुटलेल्या पाण्यामुळे द्वारका, जलविहार आणि परिसरातील सोसायट्या शुक्रवारी पाण्याखाली गेल्या होत्या.

Pune Flood Rescue
Pune Flood: पुण्यात पुन्हा पुराचा कहर; एकतानगर पाण्याखाली, सोसायट्यांमध्ये कमरेएवढे पाणी

एका इमारतीमधील एका घरात अवघ्या काही दिवसांचे नवजात बाळ आणि त्याची बाळंतीण आई पुराच्या पाण्यात अडकली होती. चारी बाजूंनी वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीमुळे दोघेही संकटात होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान रबरी बोट घेऊन तातडीने तेथे पोहचले.

Pune Flood Rescue
Malin Landslide Tragedy: माळीण दुर्घटनेला १२ वर्षे; पुनर्वसन झाले, पण जखमा अजूनही ताज्याच

कमरेएवढ्या पाण्यातून मार्ग काढत जवानांनी प्रथम आईला अत्यंत काळजीपूर्वक बोटीत बसवले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांच्या त्या बाळाला एका जवानाने अत्यंत मायेने आणि सुरक्षेने आपल्या दोन्ही हातात उराशी कवटाळले.

Pune Flood Rescue
India Defence Production: संरक्षण उत्पादन 1.76 लाख कोटींवर; स्फोटके निर्मितीत 150 हून अधिक कंपन्या परवाना प्रक्रियेत

पुराच्या पाण्यात भीतीचे सावट असतानाही जवानाने त्या चिमुकल्याला लहानशा छातीशी घट्ट धरून सुखरूप बाहेर आणले. बाळाला आणि आईला सुरक्षित किनाऱ्यावर आणल्यानंतर संपूर्ण परिसरात उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. बाळाला सुरक्षित हसताना पाहून त्या देवदूत ठरलेल्या जवानाच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news