Pune Flood Rescue: पुणे पुरात माणुसकीचा पूर; वृद्धाला वाचवण्यासाठी अग्निशमन जवानांनी कमरेएवढ्या पाण्यातून केली धाव

एकतानगरमध्ये अडकलेल्या आजारी वृद्धाला स्ट्रेचरवरून अर्धा किलोमीटर बाहेर काढले; स्थानिक नागरिकांनीही दिली जवानांना साथ
Pune Flood Rescue
Pune Flood RescuePudhari
Published on
Updated on

पुणे: सिंहगड रस्त्यावरील एकतानगर परिसरात पुराचे पाणी तुंबल्यामुळे हाहाकार उडालेला असतानाच एका इमारतीत अचानक आजारी पडलेल्या वृद्धाला त्रास व्हायला लागला. त्याला तातडीने रुग्णालयात पोहचवणे आवश्यक होते.

Pune Flood Rescue
Pune Flood: पुण्यात पुन्हा पुराचा कहर; एकतानगर पाण्याखाली, सोसायट्यांमध्ये कमरेएवढे पाणी

त्या वेळी पुराचे पाणी असतानाही अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिक साक्षात वृध्दासाठी देवदूत बनून धावून आले. कमरेएवढ्या पाण्यातून सुमारे अर्धा किलोमीटर अंतर या वृद्धाला खांद्यावर स्ट्रेचर धरून पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले.

Pune Flood Rescue
Malin Landslide Tragedy: माळीण दुर्घटनेला १२ वर्षे; पुनर्वसन झाले, पण जखमा अजूनही ताज्याच

पुराच्या पाण्याने चारही बाजूंनी वेढा घातलेल्या एकतानगरीतील एका इमारतीत राहणारे ज्येष्ठ नागरिक अचानक आजारी पडले. घराभोवती कमरेएवढे गढूळ पाणी आणि साचलेला गाळ, यामुळे रुग्णवाहिका किंवा साधे वाहन तेथपर्यंत पोहचणे अशक्य होते.

Pune Flood Rescue
India Defence Production: संरक्षण उत्पादन 1.76 लाख कोटींवर; स्फोटके निर्मितीत 150 हून अधिक कंपन्या परवाना प्रक्रियेत

वृद्धाची प्रकृती खालावत चालल्याने कुटुंबीयांची मोठी धावपळ उडाली. अशा बिकट परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि स्थानिक तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता पुढाकार घेतला आणि त्यांना बाहेर काढत रुग्णवाहिकेत बसवून दिले. जवानांनी तत्काळ ज्येष्ठ रुग्णाला स्ट्रेचरवर झोपवले. पुराच्या पाण्याचा तीव्र प्रवाह आणि खाली खड्ड्यांचा धोका असतानाही, जवानांनी आणि तरुणांनी स्ट्रेचर स्वतःच्या खांद्यावर उंचावून धरले.

Pune Flood Rescue
DRDO Military Explosives Seminar: डीआरडीओमध्ये लष्करी स्फोटके व सुरक्षेवर राष्ट्रीय मंथन; तंत्रज्ञान, सुरक्षा आणि अनुपालनावर भर

पाण्याचा तोल सांभाळत आणि गढूळ पाण्यातून वाट काढत त्यांनी त्या आजारी वृद्धाला सुरक्षितपणे मुख्य रस्त्यापर्यंत आणले. स्थानिक नागरिकांनीही या कार्यात जवानांना मोलाची साथ दिली. वृद्धाला सुखरूप बाहेर आणून रुग्णवाहिकेत बसवल्यानंतर उपस्थितांनी जवानांच्या या धाडसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news