Pune Missing Persons: पुण्यात बेपत्ता नागरिकांचा थरारक आकडा! साडेपाच वर्षांत 3,221 जणांचा अजूनही शोध नाही

‘तो परत येईल’ या आशेवर हजारो कुटुंबांचे दिवस; ऑपरेशन मुस्कानअंतर्गत पोलिसांची मोठी शोधमोहीम सुरू
Missing Persons
Missing PersonsPudhari
Published on
Updated on

पुणे: दरवाजावरची प्रत्येक टकटक, फोनची प्रत्येक रिंग आणि गर्दीत दिसणारा प्रत्येक अनोळखी चेहरा... पुण्यातील हजारो कुटुंबांसाठी आजही आशेचा किरण ठरत आहे. कारण, ‌‘तो येईल‌’, ‌‘ती परत येईल‌’ या एका आशेवर अनेक आई-वडील, पत्नी, मुले आणि कुटुंबिय वर्षानुवर्षे दिवस ढकलत आहेत. शहरातून गेल्या साडेपाच वर्षांत बेपत्ता झालेल्या तब्बल 3 हजार 221 जणांचा अजूनही कोणताही पत्ता लागलेला नाही. दरम्यान, बेपत्तांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ‌‘ऑपरेशन मुस्कान‌’ ही मोहीम हाती घेतली असल्याचे गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते सांगितले.

Missing Persons
IAF GATE Recruitment Scheme: भारतीय हवाई दलाची मोठी घोषणा! आता GATE गुणांवर थेट तांत्रिक अधिकारी होण्याची संधी

पुणे पोलिसांनी ‌‘ऑपरेशन गत शोध मोहीम सुरू केली असून, अनेक कुटुंबांची ‌‘मुस्कान‌’ अजूनही हरवलेलीच आहे. सन 2020 ते मे 2026 या कालावधीत पुणे शहरातून तब्बल 26 हजार 616 जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे. त्यातील बहुतांश जण घरी परतले, काहींचा शोध लागला; मात्र हजारो जण आजही पोलिसांच्या फाइलमध्ये ‌’मिसिंग‌’ म्हणूनच अडकून पडले आहेत.

Missing Persons
Pune Land Records Office Restructuring: पुण्यात भूमी अभिलेखात मोठा बदल! नागरिकांना मिळणार झटपट सेवा, चार नवीन कार्यालयांची पुनर्रचना

बेपत्ता झालेल्यांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 12 हजार 369 महिलांपैकी 1 हजार 76 महिला अजूनही सापडलेल्या नाहीत. अनेक महिला कौटुंबिक हिंसा, मानसिक छळ किंवा जबरदस्तीच्या नात्यांपासून दूर जाण्यासाठी घर सोडतात, तर काही मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकतात. 9 हजार 835 पुरुष बेपत्ता झाल्याची नोंद असून, त्यांपैकी 1 हजार 996 जणांचा अजूनही शोध सुरू आहे. आर्थिक ताण, कर्जबाजारीपणा, नैराश्य यामागे असल्याचे तपासात दिसून येते.

Missing Persons
Maharashtra Sports Department Controversy: बदलीसाठी शासनाविरोधात आंदोलनाला निधी? क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

सर्वाधिक काळजी वाढवणारी बाब म्हणजे अल्पवयीन मुला-मुलींची. 3 हजार 388 मुलींपैकी 126 आणि 1 हजार 24 मुलांपैकी 23 मुले अजूनही बेपत्ता आहेत. सोशल मीडियाचे आकर्षण, ऑनलाइन जाळे, प्रेमसंबंध, लग्नाचे आमिष किंवा अपहरण यामुळे अनेक निष्पाप जीव संकटात सापडत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे.

Missing Persons
Pune Crime: लग्नाचे आमिष, लिव्ह इन आणि गर्भपात; मुंबई पोलिस दलातील PSI विरुद्ध गंभीर गुन्हा

परत आलेल्यांचे रेकॉर्डच ठेवले जात नाही

पुणे पोलिसांकडून प्रत्येक पोलिस ठाण्याच्या स्तरावर बेपत्ता झालेल्यांची नोंद ठेवली जाते. त्यानंतर गुन्हे शाखेकडून ही बेपत्ता झालेल्या मुली-मुले, पुरुष-महिला यांची नोंद ठेवली जाते. यापैकी घरी कोण परतले कोण नाही, याची नोंदची काटेकोरपणे ठेवली जात नाही. त्यामुळे शहरातून बेपत्ता झालेल्यांचा आकडा मोठा असल्याचे दिसते.

मिसिंग सेलच्या सर्व पथकांना अलर्ट

पोलिसांनी ‌‘ऑपरेशन मुस्कान‌’अंतर्गत बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. गुन्हे शाखा त्याचबरोबर स्थानिक पोलिसांच्या सर्व पथकांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मिसिंग सेलचे कामकाज पाहणाऱ्या सर्व पथकांना अलर्ट करण्यात आले आहे. बसस्थानक रेल्वेस्टेशन, शहरातील महत्त्वाची प्रवासांची ठिकाणे, चौक, पदपथ या ठिकाणी पोलिसांकडून शोध मोहीम हातात घेण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news