IAF GATE Recruitment Scheme: भारतीय हवाई दलाची मोठी घोषणा! आता GATE गुणांवर थेट तांत्रिक अधिकारी होण्याची संधी

AFCAT लेखी परीक्षेतून सूट; अभियांत्रिकी पदवीधरांसाठी हवाई दलाने सुरू केली नवी भरती योजना
GATE
GATEPudhari
Published on
Updated on

पुणे: भारतीय हवाई दलाने (आयएएफ)तांत्रिक शाखेत (अधिकारी संवर्ग) पात्र व्यक्तींचा समावेशासाठी नवी योजना जाहीर केली असून अभियांत्रिकी विभागासाठीच्या पदवीधर अभियोग्यता चाचणीमधील (जीएटीई-गेट) गुणसंख्येच्या आधारे पात्र उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहेत.

GATE
Pune Land Records Office Restructuring: पुण्यात भूमी अभिलेखात मोठा बदल! नागरिकांना मिळणार झटपट सेवा, चार नवीन कार्यालयांची पुनर्रचना

या नव्या उपक्रमांतर्गत, वैध गेट गुणसंख्या मिळवलेले उमेदवार हवाई दलाच्या निवड मंडळासमोरच्या(एएफएसबीएस) चाचणीसाठी थेट निवडले जाण्यास पात्र ठरतील. ही निवड गुणवत्तेच्या आधारावर होणार असल्यामुळे उमेदवारांना हवाई दलाच्या सामायिक प्रवेश चाचणीसारख्या (एएफसीएटी) प्राथमिक लेखी परीक्षेतून सूट दिली जाईल.

GATE
Maharashtra Sports Department Controversy: बदलीसाठी शासनाविरोधात आंदोलनाला निधी? क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

गेट गुणसंख्येच्या आधारावर राबवली जाणारी ही योजना केवळ तांत्रिक शाखेतील समावेशासाठीच लागू असेल. मात्र, एएफसीएटी ही यापुढेही तांत्रिक शाखेसह भारतीय हवाई दलाच्या सर्व शाखांमधील समावेशासाठी प्रमाणित प्रवेश चाचणी म्हणून भूमिका बजावत राहील.

GATE
Pune Crime: लग्नाचे आमिष, लिव्ह इन आणि गर्भपात; मुंबई पोलिस दलातील PSI विरुद्ध गंभीर गुन्हा

गेट गुणसंख्येच्या आधारावर राबवल्या जाणाऱ्या या योजनेसाठी प्रवेश-स्तरावरील शैक्षणिक पात्रता एएफसीएटी मार्गे तांत्रिक शाखेतील समावेशासाठी सध्या लागू असलेल्या प्रवेश निकषांशी सुसंगत असेल. भारतीय हवाई दलाने स्वीकारार्ह गेट विषयांची सर्वसमावेशक सूची फेब्रुवारी 2026 मध्ये जारी केलेल्या एएफसीएटी अधिसूचनेत औपचारिकपणे जाहीर केली असून ती https:\\www.afcat.edcil.co.in तसेच www.careeriaf.gov.in या संकेतस्थळांवरुन मिळवता येईल.

GATE
Pimpri Chinchwad SRA Scam: मिलिंदनगर एसआरएमध्ये कोट्यवधींच्या टीडीआरचा खेळ? नियम धाब्यावर बसवून बिल्डरला लाभ

आकांक्षित उमेदवारांना सर्वाधिक लवचिकता आणि संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने, पात्र उमेदवारांना त्यांच्या आवडीनुसार, एएफसीएटी तसेच गेट गुणसंख्या योजना अशा दोन्ही पद्धतीने तांत्रिक शाखेतील प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. भारतीय हवाई दलात अधिकारी संवर्गातील प्रवेश योजनेबाबत वेळोवेळी अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी संभाव्य उमेदवारांना दिशा भारतीय हवाई दल @careeriniaf (इन्स्टाग्राम आणि एक्स) तसेच @DISHA बाय इंडियन एअर फोर्स (फेसबुक, यूट्यूब, लिंक्डइन) अशा अधिकृत समाज माध्यम हँडल्सचा मागोवा घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news