Pune Crime: लग्नाचे आमिष, लिव्ह इन आणि गर्भपात; मुंबई पोलिस दलातील PSI विरुद्ध गंभीर गुन्हा

स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान तरुणीसोबत सहजीवन; नोकरी लागल्यानंतर लग्नास नकार, वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Police
Police Pudhari
Published on
Updated on

पुणे: मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकावर वारजे पोलिस ठाण्यात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहून तिला लग्न करण्याचे वचन दिले.

Police
Pimpri Chinchwad SRA Scam: मिलिंदनगर एसआरएमध्ये कोट्यवधींच्या टीडीआरचा खेळ? नियम धाब्यावर बसवून बिल्डरला लाभ

पण, पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर सलग दोन वर्षे तरुणीला टाळटाळ करून तिच्याशी लग्न न करता तिची फसवणूक केली. एवढेच नाही, तर तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला बळजबरीने गर्भपात करण्यासही भाग पाडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी स्वदेश विजय चव्हाण (वय 31) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

Police
Maharashtra Government School Admissions: सरकारी शाळांकडे विद्यार्थ्यांची पाठ; चार वर्षांत पहिलीची पटसंख्या 1.37 लाखांनी घट

याबाबत वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात 31 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. स्वदेश व पीडित तरुणी पुण्यातील वारजे माळवाडी भागात राहण्यास होते. ती एका बँकेत क्लर्क म्हणून नोकरी करीत होती. तर, स्वदेश स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.

Police
Maharashtra RTE Admission: आरटीई प्रवेशाला मुदतवाढ; 89,554 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित, 25 हजार जागा रिक्त

दोघे दोन वर्षे लिव्ह इनमध्ये राहत होते. स्वदेशने तिला लग्न करू, असे सांगितले होते. लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर तरुणी गर्भवती राहिली होती. तेव्हा स्वदेशने तिचा गर्भपात केला होता. दरम्यान, नुकतीच स्वदेशची स्पर्धा परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. त्यानंतर त्याची नेमणूक मुंबई पोलिस दलात झाली. तो सध्या कुरार पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

Police
Maharashtra Maternal Mortality:महाराष्ट्रात 971 मातामृत्यू; घट असूनही हा आकडा तज्ज्ञांना चिंताजनक का वाटतो?

दरम्यान, नोकरी लागल्यानंतर तरुणी त्याला लग्नाबाबत विचारणा करायची. तेव्हा तो विषय टाळाटाळ करू लागला. मार्च 2026 मध्ये स्वदेशने तरुणीला लग्नास नकार दिला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्यावरून तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास वारजे माळवाडी पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news