Pune Metro Shivajinagar Skywalk: पुणे मेट्रो प्रवाशांसाठी मोठी सुविधा; शिवाजीनगरमध्ये दोन मार्गिकांना जोडणारा स्कायवॉक ऑगस्टअखेर तयार

५.५ कोटींच्या खर्चातून १५० मीटरचा स्कायवॉक; स्थानकाबाहेर न पडताच मेट्रो बदलता येणार
Pune Metro Shivajinagar Skywalk
Pune Metro Shivajinagar SkywalkPudhari
Published on
Updated on

पुणे: शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्यालगत हिंजवडी-शिवाजीनगर (लाइन ३) आणि स्वारगेट-पिंपरी चिंचवड (लाइन १) या दोन प्रमुख मेट्रोमार्गिकांना जोडणाऱ्या स्कायवॉकचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Pune Metro Shivajinagar Skywalk
Pune Municipal Corporation Corruption: ‘पुढारी’च्या भ्रष्टाचारविरोधी मालिकेचे पुणेकरांकडून स्वागत; महापालिका कारभारात पारदर्शकतेची मागणी

१५० मीटर लांबीचा हा स्कायवॉक ऑगस्टअखेर तयार होणार असून, केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (सीएमआरएस) तपासणीनंतर तो प्रवाशांसाठी खुला केला जाईल. सुमारे ५.५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा स्कायवॉक दोन्ही स्थानकांच्या कॉनकर्स क्षेत्राला थेट जोडण्यात येत आहे.

Pune Metro Shivajinagar Skywalk
Pune Income Tax Collection: पुण्याच्या करसंकलनात उत्पादन उद्योगांचा दबदबा; १.३३ लाख कोटींच्या करसंकलनात ४३ टक्के वाटा

यामुळे प्रवाशांना स्थानकाबाहेर न पडता किंवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा सामना न करता सहजपणे मेट्रो बदलता येईल. आयटी पार्कच्या (हिंजवडी) दिशेने जाणारे कर्मचारी तसेच पिंपरी-चिंचवड व स्वारगेटच्या प्रवाशांचा यामुळे वेळ वाचणार आहे.

Pune Metro Shivajinagar Skywalk
Pune Cyber Crime Police: सायबर गुन्हेगारांवर पुणे पोलिसांचा डिजिटल वॉच; ‘प्रगती’ प्रणालीमुळे तपासाला वेग

पुणेकरांचा प्रवास सुखकर व गतिमान करण्यासाठी महामेट्रो कटिबद्ध आहे. शिवाजीनगर येथील दोन्ही मेट्रोमार्गिकांना जोडणाऱ्या १५० मीटर लांबीच्या स्कायवॉकचे काम अंतिम टप्प्यात असून, ऑगस्टअखेरपर्यंत तो तयार होईल. ५.५ कोटी रुपये खर्चून उभारलेला हा स्कायवॉक पे-टू-पे क्षेत्राला जोडत असल्याने प्रवाशांना स्थानकातून बाहेर न पडता थेट मेट्रो बदलता येईल. तपासणी आणि लाइन ३ चे स्थानक सुरू होताच हा स्कायवॉक प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाईल.

चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महाव्यवस्थापक, महामेट्रो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news