Pune Income Tax Collection: पुण्याच्या करसंकलनात उत्पादन उद्योगांचा दबदबा; १.३३ लाख कोटींच्या करसंकलनात ४३ टक्के वाटा

आयटी दुसऱ्या तर बांधकाम क्षेत्र तिसऱ्या क्रमांकावर; डिजिटल इंटेलिजन्समुळे प्राप्तिकर विभागाची कार्यक्षमता वाढली
Income Tax Collection
Income Tax CollectionPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे शहर आणि विभागाच्या प्राप्तिकर भरण्यात उत्पादन उद्योगांचा दबदबा कायम आहे. यंदाच्या प्राप्तिकर वसुलीत पुणे क्षेत्राचे २०२५- २६ या वर्षाचे करसंकलन तब्बल १ लाख ३३ हजार कोटी आहे. यात उत्पादन क्षेत्राचा वाटा तब्बल ४३ टक्के आहे. तर, आयटी क्षेत्र मात्र दुसऱ्या आणि बांधकाम क्षेत्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Income Tax Collection
Pune Cyber Crime Police: सायबर गुन्हेगारांवर पुणे पोलिसांचा डिजिटल वॉच; ‘प्रगती’ प्रणालीमुळे तपासाला वेग

पुणे शहर हे मोठे उत्पादन आणि आयटी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. आयटी नगरी म्हणून पुणे प्रसिद्ध होत असले, तरी अजूनही उत्पादन क्षेत्राचा दबदबा कायम आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या प्राप्तिकर संकलनाच्या आकडेवारीतून हेच समोर आले आहे. शहरातील औद्योगिक अर्थव्यवस्थेत वाहन निर्मिती, अभियांत्रिकी, औषध निर्मिती, आयटी उद्योग, रसायने, इलेक्ट्रीकल- इलेक्ट्रॉनिक्स आणि अन्न प्रक्रिया उद्योगांचा मोठा वाटा आहे.

Income Tax Collection
Pune Market Yard Vegetable Rates: पुणे मार्केट यार्डात काकडीचे भाव दुप्पट; टोमॅटोची आवक वाढल्याने दर घसरले

या उद्योगांचे योगदान लक्षणीय

पुणे शहरातील मोठ्या उद्योगांत बजाज ऑटो, टाटा मोटर्स, सिरम इन्‍स्‍टिट्यूट ऑफ इंडिया या उद्योगांचा मोठा वाटा आहे. तसेच, महिंद्रा ॲन्ड महिंद्रा, मर्सिडिझ बेंझ, फोक्सवॅगन यांसह माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कॉग्नीजंट, परसिस्टंट या मोठ्या कंपन्यांसह मध्यम आणि लघुउद्योजकांचाही मोठी संख्या आहे. सेबीच्या अहवालानुसार, शहरात आजघडीला सुमारे ४ हजारांपेक्षा जास्त उत्पादन आणि पूरक उद्योग आहेत. तसेच, बांधकाम क्षेत्र आणि अन्न-औषध निर्मिती उद्योगांचेही योगदान आहे. यापैकी कोणती कंपनी किती आयकर भरते, याची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.

शहरात श्रीमंतांची संख्या किती?

शहरात ५० लाख, १ कोटी, ५ कोटी, १० कोटी, ५० कोटी, १०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या उद्योजकांची संख्या वाढत आहे. मात्र, त्यांची आकडेवारी सार्वजनिक केली जात नाही. मात्र, केंद्र सरकारने देशातील १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींची संख्या जाहीर केली, ती यंदा ५७६ इतकी आहे. मागील वर्षी हा आकडा ४१५ इतका होता. त्यात एकूण १६१ व्यक्तींची भर पडली असून, ३९ टक्के वाढ आहे. यात पुणे शहराचेही योगदान आहे.

Income Tax Collection
Pune Fruit Market Rates: पुणे फळबाजारात लिंबाचा भाव वधारला; पपई महागली, कलिंगड-खरबूज स्वस्त

पुण्याच्या करसंकलनाचे क्षेत्रनिहाय चित्र

  • उत्पादन क्षेत्र ४३ टक्के (प्रथम क्रमांकावर)

  • माहिती तंत्रज्ञान दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र

  • बांधकाम व्यवसाय तिसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र

  • अन्न, औषध इतर सेवा चौथ्या क्रमांकावर

  • देशातील अतिउच्च उत्पन्न गटाची स्थिती

  • वर्ष एकूण स्थूल उत्पन्न व्यक्तींची संख्या

  • २०२५-२६ १०० कोटी रु.अधिक ५७६

  • २०२४-२५ १०० कोटींपेक्षा जास्त ४१५

  • एका वर्षातील वाढ १६१ वाढीचे प्रमाण ३९ टक्के

डिजिटल इंटेलिजन्सची कमाल

  • पुणे विभागाचे मुख्य आयुक्त विवेक वाडेकर यांच्या म्हणण्यानुसार ही सर्व कमाल डिजिटलायझेशनची आहे.

  • ते म्हणाले, की मी जेव्हा या खात्यात भरती झालो होतो. त्या वेळी म्हणजे तब्बल ३० ते ३५ वर्षांपूर्वी टेबलावर संगणक आला तरी घाबरत असत. आता प्रत्येक टेबलावर संगणकासह सर्वंच अद्ययावत यंत्रणा आहे.

  • डिजिटल इंटेलिजन्समुळे फेसलेस विवरण पृथक्करण करणे खूप सुलभ अन‌् वेगवान झाले आहे.

  • तक्रार निवारणाचा कालावधी ५७ वरून २८ दिवसांवर आला आहे.

  • आता ई निवारण प्रकरणांचा निपटारा ९५ टक्के इतका आहे.

  • निकाली काढलेल्या अपिलांचा आकडा २ लाख २२ हजार ११३ इतका आहे.

  • सुधारित विवरणपत्रातून १२ कोटी १२२ लाख रु.महसूल मिळाला.

  • नोंद झालेल्या विदेशी मालमत्तांची किंमत १ लाख २९ हजार ९० कोटी रुपये

Income Tax Collection
Shravan Fasting Items Price: श्रावण सुरू होण्याआधी उपवासाच्या पदार्थांना मागणी; शेंगदाणा, साबुदाणा आणि गूळ महागला

आयकरचा पायाभूत सुविधांत विस्तार

  • बीएसएलएल आणि एमटीएनएलची जमीन आयकर विभागाकडे हस्तांतरित झाली आहे.

  • हडपसर येथे अर्थशीला संकुल नावाने निवासस्थाने आणि गेस्टहाऊस विभागाची विदेशी

व्यवहारात महत्त्वाची कामगिरी

विभागाने विदेशी व्यवहार (ॲडव्हान प्राईसिंग अग्रिमेंट) अर्थात एपीएएसमध्ये महत्त्वाची कामगिरी केली असून, तो टप्पा १ हजारांपर्यंत गेला आहे. तसेच डिजिटल इंटेलिजन्स आणि अनालिटिक्स लॅबची संख्या २२ पर्यंत वाढवण्यात यश आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news