El Nino February 2027: अल निनोचा फेब्रुवारीत कळस; यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र होण्याचा इशारा

चारा-पाण्याचे आतापासून नियोजन करण्याच्या सूचना; तापमानवाढीमुळे पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता
Drought
DroughtPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: अल निनो सध्या सुरूच असला, तरी त्याची तीव्रता फेब्रुवारी २०२७ मध्ये सर्वोच्च पातळी गाठणार आहे. त्यामुळे चारा, पाणी यांचे नियोजन आत्तापासूनच करावे लागणार आहे. अल निनोमुळे यंदाचा उन्हाळा देखील तीव्र राहणार असल्याचा इशारा हवामानशास्त्रज्ञांनी दिला आहे.

Drought
Patas Road Work Controversy: पाटसच्या रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थांचा सवाल; सार्वजनिक निधी खासगी घरासाठी?

रविवारी (दि. २७) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे सांगितले की, सध्या अल निनो सुरूच आहे. मात्र, त्याची तीव्रता फेब्रुवारी २०२७ मध्ये सर्वोच्च पातळीवर जाणार आहे. राज्यातील वाढत्या दुष्काळी संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकार पूर्णपणे तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Drought
Pimperkhed Cabbage Market Price: कोबीला बाजारभावाचा फटका; उत्पादन खर्चही निघेना

हवामानशास्त्रज्ञांनी याबाबतचा इशारा आधीच दिला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाचे नियोजन करण्याच्या सूचना राज्यातील सर्वच जिल्ह्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अल निनोचा प्रभाव फेब्रुवारी २०२७ मध्ये शिखर गाठणार असल्याने त्याचा परिणाम म्हणून सरासरी तापमानात मोठी वाढ अपेक्षित आहे. मार्च ते मे हा उन्हाळ्याचा हंगाम यंदा दरवर्षीच्या तुलनेत अधिक तीव्रतेचा राहणार आहे. तापमानवाढीमुळे पाणी जास्त लागणार आहे.

Drought
Chakan Road Widening: चाकणमधील पाच ठिकाणी रस्ते रुंदीकरण; तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील कोंडी सुटणार?

पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार

ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, सध्या अल निनो सुरूच आहे. त्यामुळेच यंदा जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस कमी झाला. अपवाद फक्त जुलै महिन्याचा ठरला. फेब्रुवारीत अल निनो तीव्रतेची सर्वाधिक पातळी गाठेल, त्यामुळे यंदाचा उन्हाळा कडक जाणवणार आहे. त्यासाठी राज्यात पाण्याचे नियोजन व्यवस्थित केले, तर दुष्काळाचा सामना सहज करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news