Medical Negligence Pune: वैद्यकीय निष्काळजीपणाला दणका! रुग्णमृत्यू प्रकरणी 20 लाखांची भरपाई

17 वर्षांच्या न्यायलढीनंतर कुकडे कुटुंबाला दिलासा; ‘जीवनदीप मेडिकेअर’ आणि डॉक्टर्स दोषी ठरले
Medical Negligence Pune
Medical Negligence PunePudhari
Published on
Updated on

पुणे : वैद्यकीय निष्काळजीपणा आणि सदोष सेवेचा ठपका ठेवत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पुणे खंडपीठाने ‌‘जीवनदीप मेडिकेअर सेंटर‌’ आणि डॉ. दीपलक्ष्मी रगडे यांना दणका दिला. महिलेच्या मृत्यूसाठी तिच्या कुटुंबीयांना घटनेच्या रुग्णालयात दाखल झाल्याच्या तारखेपासून 20 लाख रुपये सहा टक्के वार्षिक व्याजदराने देण्यात यावेत, तसेच उपचाराचा खर्च म्हणून सहा लाख रुपये आणि तक्रार अर्ज खर्च म्हणून 50 हजार रुपये देण्याचे आदेश मिलिंद सोनवणे आणि नागेश कुंबरे यांच्या खंडपीठाने दिला.

Medical Negligence Pune
Pune Medical Bio Waste: पुण्यात मेडिकल बायोवेस्टचा मोठा घोटाळा! शहरात रोज 9 टन कचरा, अनेक दवाखान्यांची नोंदच नाही

रूपाली कुकडे यांना 8 ऑगस्ट 2008 रोजी प्रसूतीसाठी पाषाण-सूस रोड येथील ‌‘जीवनदीप मेडिकेअर सेंटर‌’ येथे डॉ. दीपलक्ष्मी रगडे यांच्या देखरेखीखाली उपचारासाठी दाखल केले होते. प्रसव कळा सुरू झाल्यानंतर त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. या दरम्यान, टाके घालताना मोठा टॉवेल शरीरात राहिल्याने लावलेले टाके पुन्हा काढून परत घालण्यात आले. याबाबतची माहिती नंतर नातेवाईकांना कळाली.

Medical Negligence Pune
PMC Voter List Issue: महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ!

पाठीच्या कण्यातून दिलेली भूल अपुरी पडल्याने त्यांना पूर्ण भूल देण्यात आली. या दरम्यान त्यांना हृदयरोगाचा झटका आला. उपचारानंतरही योग्य देखरेख न मिळाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना रत्ना रुग्णालयामध्ये हलवण्यात आले; मात्र डिस्चार्ज कार्ड आणि आवश्यक कागदपत्रे डॉक्टरांनी वेळेवर दिली नसल्याचेही नमूद आहे. नंतर रूपाली यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्या कोमामध्ये गेल्या आणि अखेर 1 मे 2011 रोजी त्यांचे निधन झाले. अखेर, प्रशांत कुकडे यांनी पोलिस तक्रारीसोबत 20 ऑक्टोबर 2008 रोजी राज्य ग्राहक आयोगातही ॲड. ज्ञानराज संत यांच्यामार्फत दाद मागितली.

Medical Negligence Pune
Gopal Tiwari Election Story: कार्यकर्तृत्वाला वेसण घालणारी निवडणूक...– गोपाळ तिवारींच्या पराभवाची कहाणी

सतरा वर्षांच्या लढ्यानंतर मिळाला न्याय

सुरुवातीला काही ना काही कारणाने सुनावणी लांबली. त्यानंतर केस पुणे खंडपीठाकडे वर्ग झाली. त्यानंतर कोरोना काळातील न्यायालयीन कामकाजातील खंड, पुणे खंडपीठाचे व्यवस्थित सुरू न झालेले काम, या सर्व अडथळ्यांवर मात करत प्रशांत कुकडे यांनी वकिलांमार्फत सतरा वर्ष सातत्याने लढा दिला. ससून रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीनेही जीवनदीप मेडिकेअर सेंटर आणि डॉ. रगडे यांच्या निष्काळजीपणाला पुष्टी दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, वैद्यकीय अहवाल आणि पुराव्यांचा बारकाईने अभ्यास करून राज्य आयोगाने कुकडे कुटुंबाला न्याय देत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. यातील विशेष बाब म्हणजे, 17 वर्षांहून अधिक काळ या केसची सुनावणी चालली.

Medical Negligence Pune
Ward 39 Politics PMC Elections: प्रभाग 39 मध्ये चुरस शिगेला; भाजपपुढे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे आव्हान

घरातील सर्वांना झालेला मानसिक व शारीरिक त्रास तसेच रूपाली कुकडे यांच्या निधनानंतर झालेला त्रास हा कोणत्याही रकमेने भरून येणारा नाही. मात्र वैद्यकीय निष्काळजीपणा व सदोष सेवा देऊन त्या जबाबदारीतून पळ काढता येणार नाही, हेच या निकालाने सिद्ध झाले आहे व त्यामुळे राज्य आयोगाच्या पुणे खंडपीठाच्या या निकालाचे स्वागत आहे

ॲड. ज्ञानराज संत, पतीचे वकील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news