Pune Mayor Cup Wrestling: पुणे महापौर चषक स्पर्धेच्या नियोजनात ‌’कुस्ती‌’ चितपट

तांत्रिक कारणांमुळे यंदा स्पर्धा रद्द; स्वतंत्र बजेटमुळे पुढील वर्षी भव्य आयोजनाचे संकेत
Pune Mayor Cup Wrestling
Pune Mayor Cup WrestlingPudhari
Published on
Updated on

सुनील जगताप

पुणे : पुण्यातील क्रीडा क्षेत्राचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या ‌‘पुणे महापौर चषक‌’ क्रीडा स्पर्धेतून यावर्षी कुस्तीला अनपेक्षितपणे डच्चू देण्यात आला आहे. या वर्षीच्या क्रीडा नियोजनात कुस्तीचा समावेश केला नसल्याने मल्ल आणि कुस्तीप्रेमींमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. तांत्रिक कारणांमुळे यंदाची ही दंगल थेट पुढील वर्षी आयोजित केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Mayor Cup Wrestling
PMC Warehouse Scam: कोट्यवधींचा माल गोदामातच; महापालिकेतील सात अधिकाऱ्यांवर चौकशीचा बडगा

महापौर चषक स्पर्धेत अनेक खेळांचा समावेश असताना कुस्तीला वगळण्यात आल्याने चर्चांना उधाण आले होते. मात्र, प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुस्ती या खेळाचे महत्त्व लक्षात घेता त्यासाठी ‌‘स्वतंत्र बजेट‌’ची तरतूद करण्यात आली आहे. कुस्ती स्पर्धेचे आयोजन मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या स्वरूपात व्हावे, या उद्देशाने हे आर्थिक नियोजन करण्यात आले आहे. या स्वतंत्र निधीमुळे भविष्यातील स्पर्धा अधिक दर्जेदार आणि मल्लांसाठी आकर्षक बक्षिसांची लयलूट करणारी ठरेल, असा दावा केला जात आहे.

Pune Mayor Cup Wrestling
PMC Budget: विक्रमी अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह; 3045 कोटींच्या थकबाकीने महापालिकेची अडचण वाढली

या सर्व गोंधळामुळे स्थानिक तालमींमधील पैलवानांच्या सरावावर परिणाम होण्याची शक्यता असली तरी स्वतंत्र बजेटमुळे पुढील वर्षी होणारी स्पर्धा ‌‘महाराष्ट्र केसरी‌’च्या तोडीची व्हावी, अशी अपेक्षा काही मल्लांनी व्यक्त केली आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर विविध समित्या स्थापन झाल्या. या समित्यांमध्ये माझ्याकडे क्रीडा विभागाचे अध्यक्षपद आले असले तरी यापूर्वीच महापौर चषकातील स्पर्धांचे नियोजन झालेले होते. मात्र, मातीतील या खेळासाठी महापौर चषकाचे आयोजन आगामी काळात करू.

नारायण गलांडे, अध्यक्ष, क्रीडा समिती, पुणे महापालिका

Pune Mayor Cup Wrestling
Kerosene Oil | शिधापत्रिकेवर मिळणार 3 लिटर रॉकेल

पुणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर या स्पर्धांचे नियोजन करण्यात आले. त्याच वेळी मानाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होती. मार्च महिन्याच्या आता महापौर चषक होणे अपेक्षित असताना त्यासाठी पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे यावर्षी स्पर्धा न होता पुढील दोन महिन्यांमध्ये स्पर्धा घेण्याचा प्रयत्न राहणार आहे.

योगेश दोडके, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news