PMC Warehouse Scam: कोट्यवधींचा माल गोदामातच; महापालिकेतील सात अधिकाऱ्यांवर चौकशीचा बडगा

वापर न झालेल्या साहित्य प्रकरणी प्रशासनाची कारवाई; नुकसानभरपाई वसुलीचेही संकेत
PMC Warehouse Scam
PMC Warehouse ScamPudhari
Published on
Updated on

पुणे : महापालिकेच्या भांडार विभागाकडून कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी करून त्याचा वापर न करता ते गोदामात धूळ खात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणात सात अधिकाऱ्यांना जबाबदार धरत महापालिका आयुक्तांनी त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये दोन उपायुक्त, एक कार्यकारी अभियंता तसेच संबंधित विभागांचे तत्कालीन अधीक्षक यांचा समावेश आहे. आवश्यकतेनुसार संबंधितांकडून नुकसानभरपाई वसूल करण्याचे निर्देशही दिले आहेत.

PMC Warehouse Scam
PCMC Budget 2026-27: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 2026-27 अर्थसंकल्प शनिवारी सादर

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा प्रकार उघडकीस आणत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी थेट आयुक्तांकडे तक्रार करत दोषींवर कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांच्या सहभागासह एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीने या प्रकरणात 20 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामात दिरंगाईचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या.

PMC Warehouse Scam
Kerosene Oil | शिधापत्रिकेवर मिळणार 3 लिटर रॉकेल

संबंधितांकडून लेखी खुलासे मागवण्यात आले. मात्र, त्यांपैकी सात अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीची शिफारस करण्यात आली. या शिफारशीला मान्यता देत आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या खुलाशांचाही तपशील तपासला जाणार असून, दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत.

PMC Warehouse Scam
Pune Petrol Pump Closure: पुण्यात 20-30% पेट्रोल पंप बंद; रांगा वाढल्या, पण तुटवडा नाही!

कोट्यवधी रुपयांची खरेदी करूनही वस्तू वापरात न आणता गोदामात पडून होत्या. या प्रकरणात 20 अधिकाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यांपैकी सात जणांचा खुलासा असमाधानकारक असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित अधिकाऱ्यांच्या खुलाशांचाही तपास करून सर्व दोषींवर कारवाई व्हावी.

हेमंत संभूस, राज्य सरचिटणीस, मनसे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news