Kerosene Oil | शिधापत्रिकेवर मिळणार 3 लिटर रॉकेल

राज्यासाठी 37 लाख 44 हजार लिटर कोटा मंजूर; मार्च-एप्रिलमध्ये होणार वितरण
ration card kerosene
Kerosene Oil | शिधापत्रिकेवर मिळणार 3 लिटर रॉकेल
Published on
Updated on

पुणे : राज्य शासनाने युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसला पर्याय देण्यासाठी रॉकेलचे वितरण करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार जिल्हानिहाय रॉकेलचा कोटा निश्चित केला असून हे वितरण मार्च व एप्रिल महिन्यात होणार आहे.

अंत्योदय आणि प्राधान्य योजनेतील शिधापत्रिकांना रॉकेलचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रतिशिधापत्रिकेवर तीन लिटर रॉकेल मिळणार आहे. केंद्र शासनाने राज्यासाठी 37 लाख 44 हजार लिटर रॉकेलचे वितरण करण्याचे ठरविले आहे. या वितरणात अंत्योदय व प्राधान्य योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, रॉकेल विक्रीला मिळणारा प्रतिसाद तसेच उपलब्धता लक्षात घेऊन श्वेत शिधापत्रिकाधारकांनादेखील वितरण करण्यात येईल.

यासाठी ग्रामपंचायत रहिवासी दाखला पुरावा ग्राह्य धरण्यात यावा, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहे. प्रत्येक शिधापत्रिकेला महिन्याला तीन लिटर रॉकेल मिळणार आहे. जिल्हानिहाय कोटा ठरवण्यासाठी पुरवठा विभागाने शिधापत्रिकाधारकांची संख्या मागवली होती. त्यानुसार कोटा निश्चित करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news