Pune Market Yard Vegetable Price: पुण्याच्या मार्केट यार्डात १०० ट्रकमधून भाजीपाला दाखल! बटाटा, मटारसह अनेक भाज्या स्वस्त; 'या' एका भाजीचा दर मात्र वाढला

परराज्यातून मटार-बटाट्याची ३०% जास्त आवक, भावात २०% पर्यंत घसरण; टोमॅटो, फ्लॉवर, घेवडाही स्वस्त, ढगाळ हवामानामुळे एका भाजीचे उत्पादन घटले.
Pune Market Yard Vegetable Price
Pune Market Yard Vegetable PricePudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात राज्यासह परराज्यातून मटार आणि बटाट्याची आवक तीस टक्क्यांनी वाढल्याने त्याच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली. ढगाळ वातावरणामुळे फ्लॉवरच्या उत्पादनात वाढ झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात फ्लॉवर विक्रीसाठी दाखल झाला.

Pune Market Yard Vegetable Price
Pune Election Campaign Strategies: निवडणुकीत मतांसाठी काय वाट्टेल ते! 'पैसा-बिर्याणी' पासून ते 'कुकरच्या झाकणां'पर्यंत; वाचा प्रचाराच्या नाना तऱ्हा...

याखेरीज, किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 80 रुपयांपर्यंत गेल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची तोड करून बाजारात विक्रीसाठी पाठविली. फ्लॉवर, टोमॅटोसह घेवड्याचीही आवक जास्त राहिल्याने या फळभाज्यांच्या भावात दहा ते पंधरा टक्क्यांनी घसरण झाल्याचे सांगण्यात आले.

Pune Market Yard Vegetable Price
PMC Ward 41 Election: पुण्याच्या प्रभाग ४१ मध्ये महायुती vs महाआघाडी! भाजप आणि राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मोठी गर्दी, 'काटे की टक्कर'

थंडीमुळे ढोबळी मिरचीच्या उत्पादनात घट झाल्याने त्याची बाजारातील आवक रोडावली आहे. त्यातुलनेत मागणी अधिक असल्याने त्याच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती. उर्वरित सर्व फळभाज्यांची आवक जावक कायम असल्याने गत आठवड्यातील दर टिकून होते. गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. 30) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून मिळून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गतआठवड्याच्या तुलनेत आवकेत 10 ट्रकने वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

Pune Market Yard Vegetable Price
PMC Ward 41 Development: पुण्याच्या प्रभाग ४१ मधील समाविष्ट गावे अजूनही 'पाणी' आणि 'सोई'विना! सर्वांगीण विकासाचे आव्हान कायम

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 18 ते 20 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा 2 टेम्पो, राजस्थान येथून गाजर 7 ते 8 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 4 ते 5 टेम्पो, कर्नाटक येथून भुईमूग शेंग 2 टेम्पो, पंजाब आणि हिमाचल प्रदेशातून मटार 8 ते 10 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 2 ते 3 टेम्पो, तमिळनाडू येथून तोतापुरी कैरी 1 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 60 ते 65 टेम्पो इतकी आवक झाली होती.

Pune Market Yard Vegetable Price
Firing Case: कर्जत गोळीबार प्रकरणातील सराईत आरोपीला पुणे गुन्हे शाखेची अटक

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 550 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो 7 ते 8 हजार क्रेटस, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 14 ते 15 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 7 ते 8 टेम्पो, गाजर 2 ते 3 टेम्पो, घेवडा 3 ते 4, पावटा 2 ते 3 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो आणि कांद्याची सुमारे 100 टेम्पो इतकी आवक झाली.

Pune Market Yard Vegetable Price
PMPML Mismanagement: कल्याणीनगरमध्ये पीएमपीचा सावळा कारभार — बसमार्ग नाही, तरी बसथांबा!

कोथिंबीर, शेपू, चुका स्वस्त; मेथी महाग

मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक जास्त होत आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्यामुळे कोथिंबीर, शेपू आणि चुकाच्या भावात घट झाली आहे. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या भावात सर्वाधिक जुडीमागे 7 रुपये, शेपू आणि चुकाच्या भावात अनुक्रमे 3 आणि 2 रुपयांनी घट झाली आहे. तर आवक वाढूनही मेथीच्या भावात जुडीमागे 3 रुपयांनी वाढ झाली आहे. मागील रविवारी (दि.23) 50 हजार जुडी आवक झालेल्या मेथीची आज (दि.30) 60 हजार जुडी आवक नोंदविण्यात आली.

Pune Market Yard Vegetable Price
Cousin Murder Supari: चुलत भावाच्या खुनासाठी चार लाखांची सुपारी; चौघांना अटक

तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. कोथिंबिरीची 1 लाख 75 हजार जुडी आवक नोंदविण्यात आली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. कोथिंबिरीच्या जुडीला घाऊक बाजारात दर्जानुसार 3 ते 8 रुपये भाव मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news