Pune Sweet Potato Prices: नवरात्रोत्सवामुळे रताळ्यांची आवक वाढली; बार्शीच्या रताळ्यांना कराडच्या बरोबरीने भाव

पुणे मार्केट यार्डात ४० ते ६० टन रताळ्यांची आवक; गावरान रताळ्यांना प्रतिकिलो ३० ते ३५ रुपये, मागील वर्षाच्या तुलनेत दरात १० ते २० टक्के घट
Sweet Potato
Sweet PotatoPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डात रताळ्यांची आवक वाढली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातून रताळी दाखल होत असली, तरी गोड चव, आकर्षक रूप आणि लहान आकारामुळे राज्यातील गावरान रताळ्यांना ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. विशेषतः साताऱ्यातील कराड, कोल्हापुरातील मलकापूरसह यंदा प्रथमच दाखल झालेल्या सोलापूरच्या बार्शी भागातील रताळ्यांना मागणी आहे. त्यामुळे कर्नाटकच्या तुलनेत राज्यातील रताळींना प्रतिकिलो ५ ते १५ रुपये अधिक भाव मिळत आहे.

Sweet Potato
MPSC Protest Case: एमपीएससी आंदोलनप्रकरणी दुसरा गुन्हा; विनापरवानगी ड्रोन उडवल्याप्रकरणी पाच जणांवर कारवाई

नवरात्रोत्सवाला रविवारपासून (दि. ११) प्रारंभ होत असल्याने उपवासासाठी रताळे खरेदीला वेग आला आहे. शुक्रवारी (दि. ९) बाजारात एक हजार ते बाराशे पोत्यांची, म्हणजेच सुमारे ४० ते ६० टन आवक झाली. घाऊक बाजारात दर्जानुसार प्रतिकिलो २० ते ३५ रुपये भाव मिळत आहे. मात्र, वाढलेली आवक आणि पावसाच्या अनियमिततेमुळे गुणवत्तेवर झालेल्या परिणामाने मागील वर्षीच्या तुलनेत दर १० ते २० टक्क्यांनी घटले आहेत. कराड, मलकापूरची रताळे चवीला गोड असल्याने त्यांना अधिक मागणी असते. त्या तुलनेत कर्नाटकातील रताळी आकाराने मोठी आणि चवीला काहीशी तुरट असल्याने त्यांना कमी भाव मिळतो.

Sweet Potato
MPSC Paper Leak: एमपीएससी पेपरफुटीप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस, अध्यक्ष भीमनवार यांच्या राजीनाम्याची दीप्ती चौधरी यांची मागणी

बार्शीच्या रताळ्यांनी बाजारात मारली बाजी!

यंदा प्रथमच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भागातून रताळींची आवक झाली आहे. आकर्षक रूप आणि चांगल्या दर्जामुळे या रताळींनी ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. कराडच्या रताळींच्या बरोबरीने बार्शीच्या रताळ्यांनाही प्रतिकिलो ३० ते ३५ रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे बाजारात नव्याने दाखल झालेल्या बार्शीच्या रताळ्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Sweet Potato
Sujat Ambedkar MPSC Protest: ‘आंदोलनाला जामर लावाल, आंबेडकरी विचारांना नाही’; सुजात आंबेडकरांचा सरकारवर घणाघात

रताळ्यांचे घाऊक दर (प्रतिकिलो)

आवक क्षेत्र - किलोचे दर

  • मलकापूर, कोल्हापूर - ३० रुपये

  • कराड, सातारा - ३० ते ३५ रुपये

  • बेळगाव, कर्नाटक - २० ते २५ रुपये

  • बार्शी, सोलापूर - ३० ते ३५ रुपये

Sweet Potato
MPSC Student Protest: एमपीएससी आंदोलनातील १४ विद्यार्थ्यांवरील गुन्हे अन्यायकारक; रोहित पवारांचा आरोप

नवरात्रोत्सवामुळे मार्केट यार्डात रताळ्यांची आवक वाढली असून, उपवासाच्या पार्श्वभूमीवर मागणीही वाढत आहे. राज्यातील गावरान रताळे गोड चव आणि आकर्षक असल्याने त्यांना ग्राहकांची अधिक पसंती मिळते. यंदा प्रथमच बार्शी भागातून रताळी दाखल झाली आहेत. मात्र, काही मालाच्या दर्जावर परिणाम झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत दर कमी आहेत. उत्सवकाळात आवक नियमित राहील.

अमोल घुले, अध्यक्ष, श्री शारदा गजानन आडते असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news