Sujat Ambedkar MPSC Protest: ‘आंदोलनाला जामर लावाल, आंबेडकरी विचारांना नाही’; सुजात आंबेडकरांचा सरकारवर घणाघात

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा; जामर हटवण्याची मागणी, विद्यार्थ्यांची मोफत व तातडीने पुनर्परीक्षा घेण्याचे आवाहन
Sujat Ambedkar MPSC Protest
Sujat Ambedkar MPSC ProtestPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुण्यातील गरवारे कॉलेजजवळील एस. एम. जोशी पुलावर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सत्याग्रह आंदोलनादरम्यान पोलिसांकडून मोबाईल नेटवर्क जामर लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर तीव्र संताप व्यक्त करत, तुम्ही आंदोलनाला जामर लावू शकता, मात्र आंबेडकरी विचारांना जामर लावू शकणार नाही, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला.

Sujat Ambedkar MPSC Protest
MPSC Student Protest: एमपीएससी आंदोलनातील १४ विद्यार्थ्यांवरील गुन्हे अन्यायकारक; रोहित पवारांचा आरोप

एस. एम. जोशी पूल येथे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते आले होते. ते म्हणाले, जोपर्यंत जामर काढला जात नाही, तोपर्यंत आमचा आवाज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणार नाही, असे स्पष्ट करत सुजात आंबेडकर यांनी आंदोलनाला नावे ठेवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले.

Sujat Ambedkar MPSC Protest
Rajgad Fort: राजगडावर पर्यटकाचा चक्कर येऊन मृत्यू; गड-किल्ल्यांवरील वैद्यकीय सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणतात आंदोलनाला राजकीय वळण लागतंय, मग भीमनवार यांची अपॉइंटमेंट अराजकीय होती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दिल्लीतील जंतरमंतरवरही इंटरनेट बंद केले जात असल्याचा दाखला देत, हे पहिले असे सरकार आहे जे जनतेला घाबरते, अशी टीका त्यांनी केली.

Sujat Ambedkar MPSC Protest
Sugarcane Crushing Licences 2026: उच्च न्यायालयाच्या आदेशाने साखर कारखान्यांना दिलासा; १४ कारखान्यांचे ऊस गाळप परवाने मंजूर

ते म्हणाले, आपण ही व्यवस्था बदलण्यासाठी आलो असून, आंदोलनात बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी योग्य ''सुधार कायदा'' आणायला हवा, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांची मोफत आणि तातडीने पुनर्रपरीक्षा घेतली जावी. दरम्यान, विद्यार्थ्यांनी या वेळी जोरदार थाळ्या वाजवून आणि घोषणा देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news