Pune Marathi Bhasha Bhavan: पुणे विद्यापीठातील मराठी भाषा भवन प्रकल्प दहा वर्षांपासून रखडला

निधी व प्रशासकीय अडचणींमुळे बांधकाम अपूर्ण; सरकारने तातडीने लक्ष देण्याची आमदार योगेश टिळेकर यांची मागणी
SPPU
SPPUPudhari
Published on
Updated on

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनाच्या इमारतीचे काम सुरू होऊन तब्बल दहा वर्षे उलटली, तरी प्रशासकीय दिरंगाई आणि निधीच्या तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. त्यामुळे शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार योगेश टिळेकर यांनी मुंबई येथे केली.

SPPU
Pune Libraries Closing: आर्थिक अडचणींमुळे पुणे जिल्ह्यातील 53 ग्रंथालयांना टाळे

विधान परिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आ. टिळेकर यांनी या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, मराठी भाषा गौरव दिन नुकताच राज्यभर उत्साहात साजरा झाला. मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पुणे विद्यापीठ परिसरात मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मार्च 2016 मध्ये थाटामाटात करण्यात आले. मात्र त्यानंतर निधीची कमतरता, प्रशासकीय प्रक्रियेतील विलंब आणि तांत्रिक कारणांमुळे इमारतीचे बांधकाम अनेक वर्षांपासून रखडले आहे.

SPPU
Krishna Valley Development Corporation Land: कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागांच्या सातबारावर नाव लावण्याची मोहीम

या प्रकल्पाच्या अनुषंगाने विद्यापीठाने तज्ज्ञांची समितीही नियुक्त केली होती. त्या समितीच्या शिफारसीनुसार मराठी भाषा भवनात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‌‘मराठी केंद्र‌’ स्थापन करण्याचा प्रस्ताव होता. या केंद्रामार्फत मराठी भाषेत ज्ञाननिर्मिती, संशोधन आणि प्रसाराचे विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते.

SPPU
Maharashtra FCI Warehouse Scheme: राज्यात एफसीआयमार्फत एक लाख मेट्रिक टन क्षमतेची गोदामे उभारणार

मात्र, ते अजूनही पूर्णत्वास आले नाही. त्यामुळे शासनाने तातडीने या प्रकल्पाकडे लक्ष द्यावे, व आवश्यक निधी उपलब्ध करून देत बांधकाम लवकर पूर्ण करण्यासाठी त्वरित आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार टिळेकर यांनी केली.

SPPU
Pune Inner Ring Road Land Compensation: पुणे इनर रिंग रोड प्रकल्पासाठी 11 गावांच्या जमिनींचे भरपाई दर निश्चित

आराखड्यातील योजना कागदावरच राहिल्या

प्रस्तावित केंद्रात पाठ्यपुस्तक निर्मिती, कोश निर्मिती, अनुवाद कार्य, शालेय ते उच्च शिक्षणातील शिक्षकांना प्रशिक्षण, प्रशिक्षणासाठी विशेष अभ्यासक्रम व साहित्य, विविध बोलीभाषांचा अभ्यास तसेच मराठी भाषेचे संग््राहालय आणि संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र या सर्व योजना कागदावरच राहिल्या असून मराठी भाषा भवनात अद्याप मराठी भाषा केंद्र स्थापन झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news