Pune Hospital Uterus Removal Case: गाठीच्या शस्त्रक्रियेदरम्यान गर्भाशय काढल्याचा आरोप; चार डॉक्टरांसह पाच जणांवर गुन्हा

मांजरी बुद्रुक येथील साई केअर हॉस्पिटल प्रकरण; संमतीशिवाय शस्त्रक्रिया केल्याचा महिलेचा आरोप, पोलिसांकडून कागदपत्रांची तपासणी सुरू
Doctor
DoctorPudhari
Published on
Updated on

पुणे: गाठी काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या 35 वर्षीय महिलेचे संपूर्ण गर्भाशय काढल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मांजरी पोलिस ठाण्यात चार डॉक्टरांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Doctor
Pune STP Sensor Monitoring: खासगी एसटीपींवर थेट डिजिटल नजर; सोसायट्यांना सेन्सर बसवणे बंधनकारक

याप्रकरणी साई केअर हॉस्पिटल (मांजरी बुद्रुक) चे डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहुजी, डॉ. निहाल शेख, डॉ. शेहजाद शेख आणि सूरज कांबळे यांच्यावर भारतीय न्याय दंड संहिता 125(ब), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत केशवनगर येथील 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 15 सप्टेंबर रोजी मुंढवा रोड मांजरी बुद्रुक येथील साई केअर हॉस्पिटलमध्ये घडला आहे.

Doctor
Maharashtra Transporters Strike 2026: महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्सचे बेमुदत संप ५ मार्चपासून; शाळा बस आणि आंतरराज्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी या ब्युटीपार्लर व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना 2023 मध्ये सोनोग््रााफीदरम्यान गर्भाशयात छोटी गाठ असल्याचे निदर्शनास आले होते. पुढील उपचार व आयव्हीएफसंदर्भात माहिती घेण्यासाठी त्यांनी 13 सप्टेंबर 2025 रोजी मांजरी येथील साई केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भेट दिली. त्यानंतर 11 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आलेल्या सोनोग््रााफी अहवालाच्या आधारे डॉक्टरांनी गर्भाशयातील गाठ लेझर शस्त्रक्रियेद्वारे काढावी लागेल, असे सांगितले.

Doctor
Pune RTE 1 km School Rule: आरटीई प्रवेशासाठी 1 कि.मी. अट; पालकांतून संताप आणि नियम सुधारण्याची मागणी

त्यानुसार 14 सप्टेंबर 2025 रोजी त्या रुग्णालयात दाखल झाल्या. तर, 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत शस्त्रक्रिया केली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक महेश कवळे करीत आहेत. याप्रकरणी मांजरी पोलिसांत संबंधित डॉक्टरांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून रुग्णालयातील कागदपत्रे, संमतीपत्रे आणि शस्त्रक्रियेचा तपशील तपासला जात असून, वैद्यकीय तज्ज्ञांचे मतही घेतले जाणार आहे.

Doctor
Purandar Airport Land Acquisition: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला गती; भूसंपादन व शेतकऱ्यांना परताव्याचे निर्णय

हॉस्पिटलमधून सुटी मिळाल्यानंतर प्रकार उघडकीस

दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, 26 सप्टेंबर रोजी अंगावरून पिवळे पाणी जाणे व लघवीवर नियंत्रण नसणे अशी तक्रार निर्माण झाल्याने त्या पुन्हा तपासणीसाठी रुग्णालयात गेल्या. तेव्हा तपासणीदरम्यान त्यांचे गर्भाशय संपूर्ण काढून टाकल्याचा उल्लेख वैद्यकीय कागदपत्रांत असल्याचे समोर आले. महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यांनी केवळ गाठी काढण्यास परवानगी दिली होती. गर्भाशय काढण्याबाबत कोणतीही संमती दिलेली नव्हती. डॉक्टरांकडे विचारणा केल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळाले नाही, असा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news