Pune Airport Metro Connection: लोहगाव विमानतळाला थेट मेट्रो जोडणी; 16 विकास प्रकल्पांचा मोहोळ यांचा आढावा

वनाज-चांदणी चौक, रामवाडी-वाघोली मार्गांना गती; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो 94% पूर्ण
Pune Metro
Pune Metro Pudhari
Published on
Updated on

पुणे: लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रोने जोडला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात होते. सहा विविध मार्गांवर चर्चा होऊन त्यातील व्यावहारिक मार्ग अंतिम केला आहे. त्यामुळे आता विमानतळ थेट मेट्रोमार्गाने जोडला जाईल, अशी माहिती पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Pune Metro
Wildlife Conservation Technology: जागतिक वन्यजीव दिन: जंगलात ‘एआय’चा तिसरा डोळा, वन्यजीवांना डिजिटल संरक्षणाचे कवच

पुणे शहरातील विविध विकासकामे आणि प्रकल्पांसंदर्भात मोहोळ यांनी सोमवारी प्रशासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीत महत्त्वाच्या 16 विकास प्रकल्प आणि कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रोमार्गांचे काम लवकरच सुरू होणार आहे. ‌‘पीएमआरडीए‌’च्या माध्यमातून साकारलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमार्गाचे काम 94 टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गावरील 23 पैकी 13 स्टेशनचे काम एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Pune Metro
Baramati Minor Girl Social Media Abuse: अल्पवयीन विद्यार्थिनीवर सोशल मीडियावर छळ, पीडितेची पोलिसांत तक्रार

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या येरवडा कारागृह ते विमानतळ आणि कल्याणीनगर ते विमानतळ या रस्त्यांच्या विस्तारीकरण व सौंदर्यीकरणाला लवकरच सुरुवात होईल. त्यासाठी आवश्यकतेनुसार भूसंपादनही सुरू केले जाईल. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरणासाठी विमानतळाभोवती पर्यायी रस्ता तयार करण्यासंदर्भातही बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

Pune Metro
Katesavar Tree: सह्याद्रीत लाल फुलांनी फुललेले काटेसावर झाड

तसेच, बैठकीत नदीसुधार आणि नदी पुनरुज्जीवन प्रकल्पच्या कामाचाही आढावा घेत काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना मोहोळ यांनी दिल्या. तसेच, समान पाणीपुरवठा योजनेच्या अंतिम टप्प्यात उर्वरित साठवणूक टाक्यांचे व जलवाहिन्यांचे तसेच मीटर बसवण्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Pune Metro
Sugarcane Plantation Maharashtra: महाराष्ट्रातील ऊस लागवडीवर दबाव; गळीत हंगामासाठी क्षेत्र वाढीसाठी योजना

गेल्या काही दिवसांत शहरातील प्रदूषणात वाढ झाली आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात तसेच शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त केले जावेत. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारत आणि वसतिगृह इमारतीच्या सद्यस्थितीचा आढावा घेत हे कामही निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मोहोळ यांनी दिले.

या बैठकीला महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, आयुक्त नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, महामेट्रोचे कार्यकारी संचालक श्रावण हर्डीकर, लोहगाव विमानतळाचे संचालक संतोष ढोके, हवाई दलाचे अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news