Wildlife Conservation Technology: जागतिक वन्यजीव दिन: जंगलात ‘एआय’चा तिसरा डोळा, वन्यजीवांना डिजिटल संरक्षणाचे कवच

पुणे वनविभागाकडून ड्रोन, सॅटेलाइट ट्रॅकिंग आणि स्मार्ट कॅमेऱ्यांचा वापर; तस्करी व हवामानबदलाच्या संकटाला तंत्रज्ञानातून उत्तर
Drone Wildlife Conservation Technology
DronePudhari
Published on
Updated on

सुनील जगताप

पुणे: राखणाऱ्या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आता केवळ मानवी गस्त पुरेशी राहिलेली नाही. वाढती शिकार आणि अधिवासाचा ऱ्हास रोखण्यासाठी वनविभागाने आता ‌‘डिजिटल नवनिर्मिती‌’चा आधार घेतला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सॅटेलाइट ट्रॅकिंग यांसारख्या तंत्रज्ञानामुळे जंगलातील ‌‘मुक्या‌’ जिवांना आता आधुनिक संरक्षणाचे कवच मिळाले आहे.

Drone Wildlife Conservation Technology
Baramati Minor Girl Social Media Abuse: अल्पवयीन विद्यार्थिनीवर सोशल मीडियावर छळ, पीडितेची पोलिसांत तक्रार

पृथ्वीवरील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि मानवी जीवनाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे ही केवळ जबाबदारी नसून, ती काळाची गरज बनली आहे. आज जगभरात ‌‘जागतिक वन्यजीव दिन‌’ साजरा केला जात असताना, वाढते शहरीकरण आणि हवामानबदलाच्या संकटात वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यंदाचा जागतिक वन्यजीव दिन हा प्रामुख्याने वन्यजीव संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा वापर यावर आधारित आहे. सॅटेलाइट ट्रॅकिंग, ड्रोन आणि एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने दुर्मीळ प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आता सोपे झाले आहे.

Drone Wildlife Conservation Technology
Katesavar Tree: सह्याद्रीत लाल फुलांनी फुललेले काटेसावर झाड

जंगलांच्या लगत वाढलेली मानवी वस्ती आणि शेतीमुळे बिबट्या, हत्ती यांसारखे प्राणी मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. वाघ, गेंडा आणि दुर्मीळ पक्षांची तस्करी आजही जागतिक स्तरावर एक मोठे आव्हान आहे. वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी आता इंटरनेटच्या माध्यमातून डार्क वेब वाढली आहे. ही तस्करी रोखण्यासाठी सायबरतज्ज्ञांची मदत घेतली जात असून, संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर डिजिटल पाळत ठेवली जात आहे. तसेच, दुर्मीळ लाकूड आणि वनस्पतींच्या अवैध व्यापारावर नियंत्रण आणण्यासाठी ‌‘ब्लॉकचेन‌’ तंत्रज्ञानाचा विचार केला जात आहे.

Drone Wildlife Conservation Technology
Sugarcane Plantation Maharashtra: महाराष्ट्रातील ऊस लागवडीवर दबाव; गळीत हंगामासाठी क्षेत्र वाढीसाठी योजना

संवर्धनासाठी काय करावे?

केवळ कायदे करून वन्यजीव वाचणार नाहीत, तर त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. प्लास्टिकचा वापर टाळणे, पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवणे आणि जंगलातील अतिक्रमणे थांबवणे यावर भर देणे आवश्यक आहे.

Drone Wildlife Conservation Technology
Sahyadri Tiger Project: सह्याद्री व्याघ प्रकल्पात वाघांचे पुनर्वसन; पश्चिम महाराष्ट्रातील जंगलांमध्ये वाघांचे अस्तित्व दृढ

जंगलात ‌‘एआय‌’चा तिसरा डोळा

पारंपरिक कॅमेरा ट्रॅपमध्ये आता बदल झाला असून, त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जात आहे. हे स्मार्ट कॅमेरे केवळ प्राण्यांचे फोटो काढत नाहीत, तर शिकारी किंवा संशयास्पद मानवी हालचाल दिसताच अवघ्या काही सेकंदांत नियंत्रण कक्षाला ‌’अलर्ट‌’ पाठवतात. यामुळे गुन्हे घडण्यापूर्वीच ते रोखणे शक्य होत आहे.

वन्यजीव गुन्हेगारी रोखण्यासाठी‌ ‘रियल-टाइम‌’ मॉनिटरिंग

  • अधिवासाचे मॅपिंग करण्यासाठी ‌‘लिदार‌’ तंत्रज्ञानाचा वापर

  • हवामानबदलाचा वन्यजीवांवर होणारा परिणाम मोजण्यासाठी डेटा ॲनॅलिटिक्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news