Pune Lohegaon Airbase Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये पुण्याच्या लोहगाव हवाईतळाची महत्त्वाची भूमिका

सुखोई-३० एमकेआयच्या दोन स्क्वॉड्रन तैनात; मोहिमेतील नेमकी भूमिका आणि मनुष्यबळाची माहिती गोपनीय
Sukhoi
SukhoiPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: भारतीय हवाईदल दिनानिमित्त ८ ऑक्टोबरला देशभर हवाईदलाच्या शौर्याला सलाम केला जात असताना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पुण्याच्या लोहगाव हवाईतळाची भूमिका खूप महत्त्वाची ठरली. पाकिस्तानविरुद्ध मे २०२५ मध्ये झालेल्या कारवाईत पुणे हे भारतीय हवाईदलाच्या महत्त्वाच्या ऑपरेशनल तळांपैकी एक होते.

Sukhoi
Pune Kharadi Illegal Building: खेळाच्या मैदानाच्या आरक्षित भूखंडावर सहा मजली इमारत; महापालिकेचा हातोडा

लोहगाव हवाईतळावर सुखोई-३० एमकेआयची दोन स्क्वॉड्रन कार्यरत असल्याची माहिती यापूर्वी सार्वजनिक झाली आहे. २० स्क्वॉड्रन ‘लायटनिंग्ज’ आणि ३० स्क्वॉड्रन ‘रायनोस’ अशी त्यांची ओळख आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात या क्षमतेमुळे पुणे तळाचे महत्त्व अधिक वाढले होते. मात्र, या तळावरून नेमकी कोणती विमाने, किती वैमानिक आणि किती कर्मचारी प्रत्यक्ष मोहिमेत कार्यरत होते, याची अधिकृत माहिती सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर करण्यात आलेली नाही.

Sukhoi
Online Property Card Mutation: मिळकतपत्रिकेवर मृत्युपत्राची नोंद आता घरबसल्या ऑनलाइन; भूमी अभिलेख विभागाची सुविधा

पाकिस्तानला धडा शिकवण्यात महत्त्वाची भूमिका

‘ऑपरेशन सिंदूर’च्या सुरुवातीच्या टप्प्यात दहशतवादी पायाभूत ठिकाणांवर अचूक हवाईहल्ले करण्यात आले. त्यानंतर १० मे रोजी पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांवरही भारतीय लढाऊ विमानांनी हल्ले केले. डीआरडीओचे अध्यक्ष समीर व्ही. कामत यांनी पुण्यात सांगितले होते की, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सुखोई-३० एमकेआयवरून डागण्यात येणारी हवाई आवृत्तीची ब्रह्मोस क्षेपणास्त्रे हे प्रमुख आक्रमक शस्त्र होते.

Sukhoi
Malthan Stone Crusher Blasting: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंग, धुळीमुळे शेती-फळबागांचे नुकसान?; कारवाईची मागणी

त्यामुळे पुण्यासारख्या सुखोई तळांची ऑपरेशनल क्षमता या मोहिमेच्या व्यापक हवाई नियोजनात महत्त्वाची ठरली. पुण्यातील दोन लढाऊ वैमानिकांना ‘ऑपरेशन सिंदूर’मधील कामगिरीसाठी गौरवण्यात आले आहे.

Sukhoi
Balasaheb Kawade Sports Ground: मुंढव्यातील बाळासाहेब कवडे क्रीडांगणाची दुरवस्था; मैदान बनले मद्यपींचा अड्डा

लढाऊ विमानांच्या एकात्मिक वापराचे महत्त्व...

ऑपरेशन सिंदूरने भारतीय हवाईदलाच्या सेन्सर, रडार, हवाई संरक्षण, कमांड-कंट्रोल आणि लढाऊ विमानांच्या एकात्मिक वापराचे महत्त्व अधोरेखित केले. पुण्याचा हवाईतळ या व्यापक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक राहिला; मात्र त्याची अचूक ऑपरेशनल भूमिका आणि मनुष्यबळाची संख्या आजही सुरक्षेच्या दृष्टीने गोपनीय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news