Malthan Stone Crusher Blasting: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंग, धुळीमुळे शेती-फळबागांचे नुकसान?; कारवाईची मागणी

संरक्षण कुंपण कोसळले, जमिनीला भेगा; दोन वर्षांपासून तक्रारी प्रलंबित असल्याचा शेतकऱ्याचा दावा
Farm Damage Stone Crusher
Farm Damage Stone CrusherPudhari
Published on: 
Updated on: 

टाकळी हाजी: मलठण (ता. शिरूर) परिसरातील दगडखाणी व स्टोन क्रशरमधील ब्लास्टिंग आणि धुळीमुळे शेती, फळबागा तसेच जमीन व संरक्षण कुंपणांचे नुकसान होत असल्याची तक्रार पुढे आली आहे. याप्रकरणी विलास थानमल पालरेशा यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलिस प्रशासनाकडे लेखी तक्रार करून संबंधितांवर कारवाईसह नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

Farm Damage Stone Crusher
Balasaheb Kawade Sports Ground: मुंढव्यातील बाळासाहेब कवडे क्रीडांगणाची दुरवस्था; मैदान बनले मद्यपींचा अड्डा

पालरेशा यांच्या म्हणण्यानुसार, मलठण परिसरातील त्यांच्या जमिनीलगत असलेल्या भाऊसाहेब पाचंगे यांच्या भाग्यलक्ष्मी स्टोन क्रशरमधील ब्लास्टिंगमुळे संरक्षण कुंपण कोसळले असून, जमिनीला भेगा पडल्या आहेत. क्रशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे आंबा, पेरू, चिकू, जांभूळ यांसह हजारो फळझाडांचे नुकसान झाले असून, अनेक झाडे खराब झाल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे.

Farm Damage Stone Crusher
Kondhwa School Drainage Problem: कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेत अस्वच्छतेचे साम्राज्य; तुंबलेल्या ड्रेनेजमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

ब्लास्टिंग करताना आवश्यक सुरक्षित अंतर राखले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच उत्खनन व खनिज वाहतुकीदरम्यान धूळ नियंत्रणासाठी पुरेशा उपाययोजना होत नसल्याने परिसरात धुळीचे लोट पसरत असल्याचे पालरेशा यांनी नमूद केले आहे.

Farm Damage Stone Crusher
Pune Book Fair 2026: पुणे जगाची ‘पुस्तकांची राजधानी’ व्हावे; २४ व्या पुणे बुक फेअरचे उद्घाटन

पर्यावरणीय अटींची तपासणी करण्याची मागणी

खाणपट्टे व स्टोन क्रशरला परवानगी देताना वृक्षलागवड, धूळ नियंत्रण आणि सुरक्षिततेसंदर्भात विविध अटी घालण्यात येतात. संबंधित ठिकाणी या अटींचे पालन होते की नाही, याची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी केली आहे.

Farm Damage Stone Crusher
Sharadiya Navratri 2026: यंदा दहा दिवसांचा नवरात्रोत्सव; ११ ऑक्टोबरला घटस्थापना

दोन वर्षांपासूनच्या तक्रारी प्रलंबित

या प्रश्नाबाबत गेल्या दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रारी केल्याचे पालरेशा यांनी सांगितले. मात्र, अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे मूल्यांकन करावे आणि नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तक्रारीतील आरोपांची प्रत्यक्ष पाहणी व चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. याबाबत शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news