Pune Kharadi Illegal Building: खेळाच्या मैदानाच्या आरक्षित भूखंडावर सहा मजली इमारत; महापालिकेचा हातोडा

खराडीतील अनधिकृत बांधकामावर अखेर पाडकाम; तीन वेळा कारवाई करूनही बांधकाम सुरूच, अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
 Unauthorized Construction
EncroachmentPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: महापालिकेच्या विकास आराखड्यात खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर तब्बल सहा मजल्यांची इमारत उभी राहिल्यानंतर महापालिका प्रशासनाला अखेर जाग आली आहे. खराडीतील या अनधिकृत बांधकामावर यापूर्वी तीनवेळा कारवाई करूनही बांधकाम सुरूच राहिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता महापालिकेने थेट इमारत पाडून जमीनदोस्त केली. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली ही कारवाई संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त होईपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

 Unauthorized Construction
Online Property Card Mutation: मिळकतपत्रिकेवर मृत्युपत्राची नोंद आता घरबसल्या ऑनलाइन; भूमी अभिलेख विभागाची सुविधा

खराडीतील सर्व्हे क्रमांक ६३ आणि लाइन क्रमांक १२ येथील २१ हजार चौरस फुटांचा भूखंड विकास आराखड्यात खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे. हा भूखंड अनेक वर्षांपासून मोकळा असल्याचा फायदा घेत दोन विकसकांनी कोणतीही महापालिका परवानगी न घेता तेथे बांधकाम सुरू केले. नागरिकांच्या तक्रारीनंतर बांधकाम विभागाने या ठिकाणी तीनवेळा अतिक्रमणविरोधी कारवाई केली. मात्र, कारवाईनंतरही बांधकाम सुरू राहिले आणि पाहता पाहता सहामजली इमारत उभी राहिली. या बांधकामात गणेश गायकवाड यांच्यासह इतर विकसकांचा सहभाग असल्याचे अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे यांनी सांगितले.

 Unauthorized Construction
Malthan Stone Crusher Blasting: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंग, धुळीमुळे शेती-फळबागांचे नुकसान?; कारवाईची मागणी

महापालिकेच्या नोटिसा बजावूनही बांधकाम सुरू ठेवल्याने संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच, इमारत पाडण्यासाठी येणारा संपूर्ण खर्च नियमानुसार संबंधितांकडून वसूल केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, परवानगी नसलेल्या तसेच खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडावरील या इमारतीमध्ये व्यावसायिक गाळे आणि सदनिकांची विक्री सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामाची माहिती नसलेल्या सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 Unauthorized Construction
Balasaheb Kawade Sports Ground: मुंढव्यातील बाळासाहेब कवडे क्रीडांगणाची दुरवस्था; मैदान बनले मद्यपींचा अड्डा

या बांधकामावर पहिली कारवाई काम सुरू असतानाच केली होती. त्यानंतर आणखी दोनवेळा कारवाई झाली. अखेर ३० एप्रिल २०२६ रोजी शेवटची कारवाई केली. मात्र, त्यानंतरही बांधकाम सुरू राहिल्याने महापालिकेने आता थेट पाडकाम सुरू केले आहे. आरक्षित भूखंडावर सहा मजली इमारत उभी राहीपर्यंत संबंधित पदनिर्देशित अधिकाऱ्यांचे लक्ष कसे गेले नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणामागे कोणाचा राजकीय वरदहस्त होता का, कारवाईनंतरही बांधकाम कसे सुरू राहिले आणि पाडकामासाठी एवढा विलंब का झाला, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

 Unauthorized Construction
Kondhwa School Drainage Problem: कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेत अस्वच्छतेचे साम्राज्य; तुंबलेल्या ड्रेनेजमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

सर्व्हे क्रमांक ६३ मधील आरक्षित खेळाच्या मैदानावर अनधिकृत बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर तीन वेळा कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही बांधकाम सुरू राहिल्याने पुन्हा कारवाई करण्यात आली असून, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार आहे.

प्रवीण शेंडे, उपायुक्त, बांधकाम विभाग, महापालिका

महापालिकेने विकास आराखड्यात ही जागा खेळाच्या मैदानासाठी आरक्षित केली आहे. ही जागा अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेली नसून खासगी मालकीची आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता येथे बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त केले जाणार आहे. सहा मजल्यांचे बांधकाम होईपर्यंत संबंधित अधिकारी काय करीत होते? याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाणार आहे

अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news